Tarun Bharat

मडगावातील घाऊक मासळी बाजार बंद

मासे कापणारे 5 जण कोविडबाधित आढळल्याने एसजीपीडीएचा आदेश

प्रतिनिधी / मडगाव

दक्षिण गोवा नियोजन व विकास प्राधिकरणाने (एसजीपीडीए) शुक्रवारपासून घाऊक मासळी बाजार बंद ठेवला आहे. मासे कापणाऱया 5 जणांना कोविडची बाधा झाल्याचे आढळल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. एका नोटिसीद्वारे एसजीपीडीए सदस्य सचिव वर्तिका डगूर यांनी घाऊक मासळी बाजार तत्काळ बंद करण्याचे आदेश दिल्यानंतर सदर मार्केट बंद करण्यात आले. सध्या हा बाजार बंद आहे व पुढील आदेश येईपर्यंत तो बंदच राहील, असे नोटिसीत स्पष्ट करण्यात आले आहे.

आंतरराज्य मासळी व्यापारी व घाऊक विक्रेते याबाबतीत सहकार्य करतील, अशी माहिती घाऊक मासळी विक्रेते संघटना अध्यक्ष एम. इब्राहीम यांनी दिली आहे. यापूर्वी कोविडच्या काळात असोसिएशनने स्वतःहून खबरदारी म्हणून घाऊक मासळी बाजार बंद केला होता, याकडे त्यांनी लक्ष वेधले. राज्यभरातील कोविड प्रकरणांमध्ये वाढ झाली असून गेल्या महिन्यात मासळीची बाजारपेठ पुन्हा सुरू झाल्यापासून उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सोशल डिस्टन्सिंग पाळले जात नाही, असे एसजीपीडीएच्या अधिकाऱयांच्या निदर्शनास आले होते.

विक्रेते व हजारो ग्राहक एकाचवेळी गर्दी करत असल्याने एसजीपीडीएने संपलेल्या आठवडय़ाच्या सुरुवातीला असोसिएशनला कारणे दाखवा नोटीस बजावली होती. सोशल डिस्टन्सिंग पाळले जात नाही आणि सेनिटायजरचा वापर करण्यात येत नसल्याचा ठपका त्यात ठेवला होता. यामुळे प्राधिकरण कोणती तरी कारवाई करणार असल्याचे संकेत मिळू लागले होते. त्यातच मासे कापणारे 5 जण कोविडबाधित निघाल्यानंतर बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, शुक्रवारपासून घाऊक मासळी मार्केट बंद असले, तरी लगतच्या काही रस्त्यांवर मासेवाहू वाहने उभी करून काहींनी बेकायदा व्यवसाय केल्याचे व काल पोलिसांनी अशी काही वाहने पिटाळून लावल्याचे सांगण्यात आले.

Related Stories

तांत्रिक युगात लोकजागरणाचे कीर्तन देश, काळ परिस्थितीनुसार व्हावे

Amit Kulkarni

पंचायतींची पाटी अद्याप कोरीच

Patil_p

दिव्यांगांसाठी होणार पर्पल महोत्सव

Amit Kulkarni

‘त्या’ यशस्वी विद्यार्थ्यांचे आपकडून अभिनंदन

Amit Kulkarni

काणकोणात मलेरिया, डेंग्यु रोगासंबधी जागृती सुरू

Amit Kulkarni

राजधानीत कार्निव्हलची धूम

tarunbharat