Tarun Bharat

मडगावातील दोन्ही बाजारपेठांची नगराध्यक्षांकडून पाहणी

अटींचे पालन होत आहे की नाही याची पालिका पथकासोबत खातरजमा, उल्लंघन होत असल्यास कारवाई करण्याचे मार्केट निरीक्षकांना निर्देश

प्रतिनिधी / मडगाव

मडगावातील न्यू मार्केट तसेच ग‍ांधी मार्केटमधील 50-50 टक्के दुकाने आळीपाळीने खुली करण्यास सोमवारपासून सुरुवात झाली असली, तरी सोशल डिस्टन्सिंगच्या बाबतीत अधिक प्रयत्न होण्याची गरज ‘तरुण भारत’ने व्यक्त केल्यानंतर नगराध्यक्षा पूजा नाईक यांच्यासोबत पालिकेच्या पथकाने दोन्ही बाजारपेठांची मंगळवारी पाहणी केली.

स्थानिक नगरसेवक दामोदर नाईक, नगरसेवक राजू (हॅडली) शिरोडकर, प‍ालिकेचे मार्केट निरीक्षक सीमा घोडगे व सांतो फर्नांडिस तसेच अन्य अधिकारी व कर्मचाऱयांनी सकाळी प्रथम न्यू मार्केटची पाहणी केली. नंतर गांधी मार्केटची पाहणी सुरू असताना मुख्याधिकारी अजित पंचवाडकर यांनी उपस्थिती लावली.

खातरजमा करण्यासाठी पाहणी : नाईक

अर्धी-अर्धी बाजारपेठ आळीपाळीने सुरू करण्यास आम्ही मुभा दिली असली, तरी सोशल डिस्टन्सिंग पाळण्याची व सर्व विपेते तसेच ग्राहकांनी मास्क वापरण्याची सक्ती करण्यात आलेली आहे. या सक्तीचे पालन होते की नाही याची खातरजमा करण्यासाठी ही पाहणी करण्यात आल्याची माहिती नगराध्यक्षा नाईक यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

अटींचे पालन न झाल्यास कारवाईचे निर्देश

या पाहणीत दोन्ही बाजारांतील पिवळय़ा व पांढऱया रेषेतील दुकाने नियमानुसार खुली असल्याचे दिसून आले. मात्र काही दुकानांवर ग्राहकांच्या गर्दीमुळे सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन होत असल्याचे आढळून आले असता ग्राहकांना रांगेत अंतर ठेवून उभे राहण्यास सांगण्यात आले. सोशल डिस्टन्सिंगचे यापुढे पालन न झाल्यास कारवाई करण्याचे निर्देश नगराध्यक्षांनी यावेळी मार्केट निरीक्षकांना दिले. कामगारांना वरचेवर बाजारपेठांत फेरफटका मारून शिस्तीचे पालन होत आहे की नाही यावर नजर ठेवण्यास सांगितले असल्याचे नगराध्यक्षांनी स्पष्ट केले.

ग‍ांधी मार्केटमध्ये काही दुकाने खास करून पादत्राणांची दुकाने अतिक्रमण करून दुकानाबाहेर माल लटकवून ठेवत असल्याचे आढळून आले. त्यावेळी सदर दुकानांनी लटकविलेल्या पादत्राणांच्या माळा हटविण्यास सांगण्यात आले.

विक्रेत्यांना अटी पाळण्याच्या सूचना : आजगावकर

गांधी मार्केटमधील विपेत्यांना नियमानुसार रेषेचे पालन करा व मास्क वापरा असे आपण आज स्पष्ट केलेले आहे, असे गांधी मार्केट विक्रेते संघटनेचे नेते राजेंद्र आजगावकर यांनी सांगितले. याचे पालन न करणाऱयांची दुकाने 17 मेपर्यंत बंद करण्यात येतील असे संघटनेतर्फे स्पष्ट करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच सकाळी 7 च्या आधी दोन्ही रेषांतील काही दुकानदार दुकाने खुली करत असल्याचे दावे करण्यात येत आहेत. तसे असल्यास पालिकेने निश्चितच कारवाई करावी, संघटना सहकार्य करेल, असे आजगावकर यांनी सांगितले.

Related Stories

मोपा लिंकरोडसाठी झाडांची कत्तल जोरात

Amit Kulkarni

विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जची चौकशी करा

Amit Kulkarni

कदंबच्या बसला पर्वरी येथे अपघात

Amit Kulkarni

लॉकडाऊनच्या काळात 9 टन भाजीपाला सेंद्रिय पद्धतीने पिकविला, 2 हेक्टर जमिनीत आता प्रथमच बासमती भाताची लागवड करणार

Omkar B

फिरणाऱया कोरोना संशयितांना शोधण्यासाठी ‘कोविड लोकेटर’ ऍप

Patil_p

‘हर घर जल’ देणारे गोवा पहिले राज्य : मुख्यमंत्री

Amit Kulkarni