Tarun Bharat

मडगावातील रस्त्यांची अवस्था दयनीय

निषेध केल्यानंतरच तात्पुरती कृती : शॅडो कौन्सिलकडून संताप

प्रतिनिधी /मडगाव

मडगावमधील रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. 12 महिन्यांत कधीही प्रवाशांना या व्यावसायिक राजधानीत गुळगुळीत पृष्ठ भाग असलेल्या रस्त्यावरून वाहन चालवण्याचा आनंद मिळाला नाही. प्रत्येक वषी आम्हाला रस्त्यावर यावे लागते आणि खराब रस्त्यांबाबत निषेध करावा लागतो. तेव्हाच काही तरी कृती दिसून येते, ती सुद्धा तात्पुरती टिकते, असे सांगत शॅडो कौन्सिलचे निमंत्रक सावियो कुतिन्हो यांनी संताप व्यक्त केला आहे.

मडगावमध्ये आम्ही यापूर्वी पाहिले आहे की, रस्त्यांच्या हॉटमिक्स डांबरीकरण कामाच्या सुरुवातीस दोन राजकीय गट श्रेय घेण्यासाठी एकमेकांशी कसे भांडतात.   कोटय़वधींचा सार्वजनिक निधी गोव्यातील रस्त्यांवर खर्च केला जातो. परंतु करदात्यांना कधीही चांगल्या दर्जाचे रस्ते मिळत नाहीत. गोव्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाने सर्व रस्ते संशोधन कचऱयाच्या डब्यात टाकले आहे. या विभागातील भ्रष्टाचार उच्च स्तरावरील आहे, अशी टीका त्यांनी केली आहे.

गुरुवारी आम्ही पीडब्ल्यूडी अधिकाऱयांसोबत रस्त्यांच्या दुरुस्तीचे काय काम केले जात आहे आणि कोणत्या कंत्राटदाराने काम मिळवले आहे हे तपासण्यासाठी गेलो होतो. आम्ही या निकृष्ट दर्जाच्या कामाची खोलवर जाऊन तपासणी करतो, कारण शेवटी प्रवाशांना आणि अन्य सामान्य जनतेला सारा त्रास होतो, याकडे कुतिन्हो यांनी लक्ष वेधले आहे. यावेळी त्यांच्यासोबत डॉ. रोझलीन पेरेरा, ऍड. स्नेहल वंसकर, इफ्तियाज सय्यद, दामोदर वंसकर आणि डॉमनिक कुतिन्हो उपस्थित होते.

Related Stories

लीगमधील अव्वल स्थानासाठी आज मुंबई-एटीके आमनेसामने

Amit Kulkarni

काणकोण तालुक्याचा गायतोंडे दिन विस्मृतीत

Amit Kulkarni

‘लोकमान्य’ काणकोण शाखेतर्पे रश्मी कामत यांचा गौरव

Amit Kulkarni

अयोध्येतील श्रीराम मंदिर भारतीयांची एकात्मता अधिक सशक्त करणार

Patil_p

पद्मनाभ रघुनाथ हेदे यांचे निधन

Amit Kulkarni

सतत पावसामुळे वाळपई नगरपालिका क्षेत्रातील हॉटमिक्स डांबरीकरण बंद

Amit Kulkarni