Tarun Bharat

मडगावात लाखो रुपयांच्या इलेक्ट्रीक यंत्रणेची चोरी

स्टॉक रजिस्टर तपासल्यानंतर कळेल निश्चित आकडा

प्रतिनिधी/ मडगाव

कालकोंडा मडगाव येथुल एका गोदामातून लाखो रुपये किंमतीचे इलेक्ट्रीक मोटर्सची चोरी करण्यता आली आहे.

सध्या दोन  इलेक्ट्रीक मोटर्स चोरीस गेल्याचे आढळून आलेले असून या दोनच मोटर्सची किंमत सुमारे 2 लाख इतकी आहे. त्याशिवाय या गोदामात अनेक लहान मोटर्स गायब झालेले असल्याचे सध्या दिसून आलेले असले तरी नक्की किती इलेक्ट्रीक मोटर्स गायब झालेले आहेत हे कागदपत्रांची तपासणी केल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.

या चोरीप्रकरणी मेसर्स रंगनाथ सिनाय काकोडकर या आस्थापनाचे एक भागिदार घनशाम काकोडकर यानी मडगाव पोलीस स्थानकात तक्रार केली आहे. या आस्थापनाचे सिने लताजवळील द्वारका बिल्डिग येथे कार्यालय असले तरी कालकोंडा -मडगाव येथे दोन गोदाम आहेत. या दोन्ही गोदामात विद्युत उपकरणे, पंप, इलेक्ट्रीक मोटर्सचा साठा ठेवला जातो.

 एका शेजाऱयाने या चोरीसंबंधीची तक्ररदाराला कल्पना दिली. गोदामाच्या खिडकीला असलेल्या ग्रीलची मोडतोड करण्यात आलेली असून चोरीची आशंका या शेजाऱयाने व्यक्त करताच तक्रारदाराने घटनास्थळी धाव घेतली आणि पाहणी केली तेव्हा दोन मोठे इलेक्ट्रीक मोटर्स चोरीस गेल्याचे स्पष्ट झाले.

 त्याशिवाय आणखीनही मोटर्स गायब असल्याचे दिसून आले. स्टॉक रजिस्टर तपासल्यानंतर चोरीस गेलेल्या मालाची निश्चित किंमत कळेल असे तक्रारदाराने पोलिसाना माहिती दिलेली आहे.

30 ऑक्टोबर ते  5 ऑक्टोबर 2020 या दरम्यान ही चोरी झाल्याचा अंदाज आहे. या प्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद करावा आणि चोरीस गेलेला माल पुन्हा मिळवून द्यावा अशी विनंती तक्रारदाराने मडगाव पोलिसांना केली आहे.

Related Stories

वीज बिलांतील 50 टक्के सवलत हा निष्काळजीपणे घेतलेला निर्णय

Patil_p

त्या दोन्ही सायंटिफिक असिस्टंटना त्वरित सेवेत घ्यावे

Amit Kulkarni

तुरडाळ : ‘लाखाचे बारा हजार’ करणारा व्यवहार!

Amit Kulkarni

राज्यपाल, मुख्यमंत्र्यांकडून क्रांतिदिनाच्या शुभेच्छा !

Amit Kulkarni

संजीवनी कारखाना बंद केलेला नाही

Patil_p

फातोर्डा दामोदर देवस्थानात महाशिवरात्री

Amit Kulkarni