Tarun Bharat

मडगाव नगराध्यक्षांची 12 रोजी निवड

प्रतिनिधी /मडगाव

गोवा नगरपालिका अधिनियमांच्या अंतर्गत मडगाव पालिकेला सूचना देण्यात आली असून त्यानुसार मडगाव पालिकेवर निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांची खास बैठक 12 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वा. होणार आहे. नगराध्यध्यक्षांची निवड करण्यासाठी मडगाव पालिका सभागृहात ही खास बैठक बोलाविण्यात आली आहे.

यासाठी विकास गावणेकर, अतिरिक्त सचिव (वित्त), सचिवालय, पर्वरी यांची निर्वाचन अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नगराध्यक्षपदासाठी इच्छुक उमेदवारांना 11 रोजी दुपारपूर्वी केव्हाही आपला उमेदवारी अर्ज मडगाव पालिकेच्या मुख्याधिकाऱयांच्या कार्यालयात सादर करता येईल. मुख्याधिकाऱयांच्या कार्यालयातून निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज उपलब्ध होणार आहेत, असे पालिका संचालक गुरुदास पिळर्णकर यांनी जारी केलेल्या सूचनेत म्हटले आहे.

मडगाव पालिकेच्या नगराध्यक्ष निवडीसाठी भाजप आणि विरोधकांत सध्या जोरदार रस्सीखेच सुरू असून निवडणुकीत सुरळीतपणे मार्गक्रमण होण्यासाठी आणि जवळपास 17 वर्षांनंतर पालिकेवर आपला ध्वज फडकविण्यासाठी भाजप कोणतीही कसर सोडण्यास तयार नसल्याचे दिसून येत आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत, काँग्रेसमधून भाजपात हल्लीच प्रवेश केलेले आमदार दिगंबर कामत यांचा समावेश असलेल्या भाजपच्या नेतृत्वाने गोवा फॉरवर्डप्रणित एका ज्येष्ठ नगरसेवकाला जवळपास भाजपात ओढण्यात यश मिळविले असून येत्या दोन-तीन दिवसांत सदर नगरसेवक अधिकृतरीत्या भाजपात प्रवेश करू शकतो, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

Related Stories

विधानसभा निवडणूक स्वबळावर लढविणार

Amit Kulkarni

दोन महिन्यानंतर थोडीशी विश्रांती व पुन्हा ‘ऑफिस’

Amit Kulkarni

रायबंदर-चोडण फेरीबोट प्रवाशांचे दोन दिवस हाल

Amit Kulkarni

अट्टल चोरटय़ाला पणजी पोलिसांनी केली अटक

Patil_p

नुकसानीचा आकडा वाढण्याची शक्मयता

Amit Kulkarni

पंचायत निवडणुकीसाठी आतापर्यंत 4724 अर्ज

Patil_p