Tarun Bharat

मडगाव, पर्वरी केंद्रांतील रुग्णवाढ चिंताजनक

राज्यभरात मंगळवारी कोरोनाचे 562 रुग्ण ; सक्रिय रुग्ण पाच हजारांजवळ, तिघांचा मृत्यू

प्रतिनिधी / पणजी

राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढत असून सक्रीय रुग्णसंख्या पाच हजारांच्या जवळ पोहोचत आली आहे. मृत्यूचे सत्रही सुरूच आहे. मंगळवारी 24 तासात तिघांचा मृत्यू झाल्यामुळे कोरोनामुळे आतापर्यंतच्या मृतांची संख्या 853 झाली आहे. मडगाव, पर्वरी भागात वेगाने रुग्ण वाढत असून दोन्ही केंद्रात रुग्णवाढ चिंताजनक बनली आहे.

मंगळवारी सापडलेल्या 562 रुग्णांद्वारे राज्यातील सक्रिय रुग्णसंख्या 4888 एवढी झाली आहे. 236 रुग्ण बरे झाले आहेत. संशयित रुग्ण म्हणून 97 जणांना गोमेकॉत भरती करण्यात आले तर 307 जणांना गृह विलगीकरण देण्यात आले आहे. आतापर्यंत एकूण 63342 जणांना कोरोनाची बाधा झाली होती, त्यातील 57601 जण बरे झाले आहेत.

मडगावची रुग्णसंख्या 523

राज्यात विविध आरोग्य केंद्रात उपचार घेणाऱया रुग्णात सर्वाधिक 523 रुग्ण मडगाव केंद्रात आहेत. द्वितीय स्थानी पर्वरी केंद्र असून तेथे 460 रुग्ण आहेत. त्याखालोखाल पणजी केंद्रात 340, फोंडय़ात 369, म्हापसात 330, कांदोळीत 311, कुठ्ठाळीत 275, वास्कोत 239, चिंबल 177, शिवोलीत 165, कासावलीत 155, डिचोली 113, खोर्लीत 110, सांखळी 107, पेडणे 104, सांगे व चिंचिणीत प्रत्येकी 92, नावेली 87, हळदोणे 86, शिरोडा व काणकोणमध्ये प्रत्येकी 82, कुडतरी 76, कोलवाळ 68, कुडचडे 63, धारबांदोडा 60, वाळपईत 50 रुग्ण आहेत. अन्य सर्वत्र त्यापेक्षा कमी रुग्ण आहेत. सक्रीय रुग्णांची केंद्रवार संख्या पुढीलप्रमाणे आहेः डिचोली 113, सांखळी 107, पेडणे 104, वाळपई 50, म्हापसा 330, पणजी 340, हळदोणा 86, बेतकी 34, कांदोळी 311, कासारवर्णे 12, कोलवाळ 68, खोर्ली 110, चिंबल 177, शिवोली 165, पर्वरी 460, मये 33, कुडचडे 63, काणकोण 82, मडगाव 523, वास्को 239, बाळ्ळी 44, कासावली 155, चिंचिणी 92, कुठ्ठाळी 275, कुडतरी 76, लोटली 66, मडकई 31, केपे 34, सांगे 92, शिरोडा 82, धारबांदोडा 60, फोंडा 369 व नावेलीत 87 रुग्ण आहेत. त्याशिवाय रेल्वे, विमान आणि रस्तामार्गे आलेले 18 बाधित सापडले आहेत.

Related Stories

मोफत पाणी योजनेचा कितपत फायदा होईल हे कोडेच

Amit Kulkarni

सत्ता असो वा नसो आपल्याला काही फरक पडत नाहीय ः कामत

Patil_p

साहित्य माणसाला जगण्याची नवीन दिशा दाखवू शकते

Patil_p

मडगाव भाजपच्या वैद्यकीय शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

Amit Kulkarni

रावण सत्तरी विद्यालयाकडे जाण्यासाठी रस्ता हवा

Amit Kulkarni

चोर्ला घाट महामार्ग डांबरीकरणाचे काम सुरु

Amit Kulkarni