Tarun Bharat

मडगाव पालिका मुख्याधिकाऱयांच्या वाढदिन पार्टीत कोविड अटींचा फज्जा

Advertisements

व्हिडीओ व्हायरल, सरकारने त्वरित कारवाई करावी : पालिका कर्मचारी संघटनेची मागणी

प्रतिनिधी / मडगाव

मडगाव पालिकेचे मुख्याधिकारी अजित पंचवाडकर यांनी पालिकेतील कर्मचाऱयांची सतावणूक चालविली असल्याच्या तक्रारींची दखल घेऊन तसेच त्यांच्यावर कथित विनयभंगाची तक्रार असल्याने त्यांच्या बदलीची मागणी उचलून धरलेल्या पालिका कर्मचारी संघटनेने पंचवाडकर यांनी मंगळवारी आपला वाढदिवस साजरा करण्यासाठी आयोजित केलेल्या पार्टीमध्ये उपस्थित सर्वांनी सोशल डिस्टसिंग व मास्क वापरणे हे कोविडविषयक नियम धाब्यावर बसविल्याने निशाणा साधला आहे. या वादग्रस्त मुख्याधिकाऱयांवर सरकारने त्वरित कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

संघटनेचे सरचिटणीस अनिल शिरोडकर यांनी मुख्याधिकारी पंचवाडकर यांच्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओचा संदर्भ देताना कारवाईची मागणी केली आहे. आम्हाला त्यांच्या वाढदिवस साजरा करण्याबाबत काही आक्षेप नाही. प्रत्येकाने वाढदिवस साजरा करावा. मात्र सध्या राज्यभर कोविडचा फैलाव झालेला असून मडगावात तर सर्वांत जास्त रुग्ण आढळून येत आहेत. या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंग न पाळणे, एकानेही मास्क परिधान न करणे यातून हा अधिकारी कोणता संदेश देण्याचा प्रयत्न करत आहे, असा सवाल शिरोडकर यांनी उपस्थित केला आहे.

कोविड कमांडंटला न शोभणारी कृती

सरकारने कोविड कमांडंट म्हणून पंचवाडकर यांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे कोविड आटोक्मयात राहील व तो फैलावणार नाही यासाठी त्यांच्याकडून प्रयत्न व्हायला हवेत. परंतु ते ज्याप्रकारे एकाच्या तोंडातून दुसऱयाच्या व त्यापुढे इतरांच्या तोंडात केक भरवत असल्याचे व्हायरल व्हिडीओतून स्पष्ट होत आहे ते पाहता हा कोविड कमांडंट कोविड रोखण्याचा की, फैलावण्याचा प्रकार करत आहे याचे स्पष्टीकरण सरकारने त्यांच्याकडून घ्यावे. हा प्रकार चुकीचा असल्याचे सरकार मान्य करत असल्यास या अधिकाऱयाला निलंबित करावे, अशी मागणी शिरोडकर यांनी केली आहे.

सोशल मीडियावर तीव्र पडसाद

फेसबुक, व्हॉट्सऍप आदी समाजमाध्यमांवर सदर पार्टीत या अधिकाऱयाने व मडगाव पालिकेच्या अन्य उपस्थित अधिकाऱयांनी सोशल डिस्टसिंग व मास्क वापरण्याच्या नियमाचा फज्जा उडविल्याबद्दल तीव्र प्रतिक्रिया व्यक्त झाल्या आहेत. एकच केकचा तुकडा उपस्थित कित्येकांच्या तोंडात भरविल्याने ही तर कोविडला आमंत्रण देणारी कृती असल्याची टीका मुख्याधिकाऱयांना उद्देशून करण्यात आली आहे.

Related Stories

निवडणूक आयुक्त गर्ग यांचा राजीनामा

Amit Kulkarni

स्टेट बँकेतर्फे मोबाईल एटीएम सेवा प्रारंभ

Omkar B

मोर्चानंतर दोन्ही आंदोलकांची सुटका

Omkar B

भाजपकडून गोवा मुक्तीदिन सोहळय़ाच्या निविदेत भ्रष्टाचार

Patil_p

कुंभारजुवे मतदारसंघात बदलासाठी मला निवडावे

Amit Kulkarni

डॉ. विशाल च्यारीचा अद्याप शोध लागेना

Patil_p
error: Content is protected !!