Tarun Bharat

मडगाव पालिकेच्या कचरापेटय़ा मोठय़ा प्रमाणात पडून

प्रतिनिधी/ मडगाव

घरगुती कचरा साठवून ठेवण्यासाठी वापरात आणल्या जाणाऱया कचरापेटय़ा पालिकेच्या जुन्या बाजारातील गॅरेजजवळील अडगळीच्या ठिकाणी टाकलेल्या आणि विखुरलेल्या असल्याचे दिसून येत आहे. वर्षभरापासून सदर कचरापेटय़ा पडून असल्याचे सांगण्यात आले.

जुन्या बाजारातील गॅरेजजवळील जागेत हजारोंच्या संख्येने काळय़ा आणि हिरव्या रंगाच्या डबावजा कचरापेटय़ा शेडमध्ये टाकल्या गेल्या आहेत. शेडमध्ये पडलेल्या सदर पेटय़ा वितरणानंतर शिल्लक राहिलेल्या आहेत की, घरोघरी त्यांचे अद्यापही वाटप करण्यात आलेले नाही हा प्रश्न अनुत्तरित आहे.

सरकारने पुरविलेल्या या कचरापेटय़ांचे वितरण झालेले नाही काय की, शिल्लक राहिलेल्या पेटय़ा अशाच टाकून देण्यात आलेल्या आहेत, असा प्रश्न मडगाव पालिकेच्या आवारात उपस्थित केला जात आहे. पालिका क्षेत्रात जवळपास 40  हजार घरे व आस्थापने आहेत. घरांना ओला व सुका कचरा वेगवेगळा साठवून ठेवण्यासाठी या पेटय़ा वापरात आणणे आवश्यक आहे. गेल्या वेळी काही घरांना अशा कचरापेटय़ांचे वाटप झाले होते.

नगराध्यक्षा पूजा नाईक यांच्याशी यासंदर्भात विचारणा केली असता काही घरांना स्थानिक नगरसेवकांमार्फत कचरापेटय़ांचे वितरण करण्यात आले होते असे त्यांनी सांगितले. उर्वरित घरांना वितरण करण्यासाठी त्या जुन्या बाजाराच्या ठिकाणी गॅरेजनजीक साठवून ठेवण्यात आल्या होत्या. चार महिन्यापूर्वी त्यांचे वितरण केले जाणार होते. मात्र तोपर्यंत कोविडने डोके वर काढल्याने नियोजनानुसार वितरण होऊ शकले नसल्याचे त्यांनी नजरेस आणून दिले. आपण याकडे लक्ष देणार असून शिल्लक असलेल्या कचरापेटय़ांची संख्या संबंधित विभागांकडून जाणून घेणार असल्याचे नाईक यांनी सांगितले.

Related Stories

बांदोडाचा महालक्ष्मी नागरिक समितीचा चित्ररथ प्रथम

Amit Kulkarni

आमदार डिकॉस्ता – कवळेकर यांच्यात पुन्हा शाब्दिक बाचाबाची

Patil_p

ओबीसी आरक्षण प्रकरण न्यायालयात

Amit Kulkarni

सांगेचा प्रभाग 1 अनु. जमातींसाठी राखीव ठेवल्याने तीव्र नाराजी

Patil_p

फॉर्मसाठी संघर्ष करणाऱया बेंगलोरचा सामना हैदराबादशी

Amit Kulkarni

मुंबई उच्च न्यायालय न्यायमूर्तींच्या निवडीसाठी दहा नावांची शिफारस

Amit Kulkarni