Tarun Bharat

मडगाव पालिकेवर गोमंतकीय विक्रेत्यांचा मोर्चा

बेकायदेशीर परप्रांतीय विक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी, व्यवसायावर परिणामांचा दावा

प्रतिनिधी /मडगाव

मडगाव पालिका क्षेत्रात बेकायदा फळभाज्या व फुलविक्री करणाऱया परप्रांतियांवर कारवाई करण्याची मागणी गोमंतकीय विपेत्यांनी सोमवारी मडगाव पालिकेवर मोर्चा नेऊन केली. यावेळी मुख्याधिकारी आग्नेल फर्नांडिस यांची भेट घेऊन त्यांनी आपली गाऱहाणी मांडली. बेकायदा परप्रांतीय विपेत्यांमुळे स्थानिक गोमंतकीयांच्या व्यवसायावर परिणाम होत असल्याचा दावा यावेळी या विपेत्यांनी केला. अलीकडे दसऱयाला झेंडूच्या फुलांची विक्री करण्यासाठी परप्रांतीय विक्रेते मोठय़ा संख्येने आल्याने स्थानिकांना ग्राहक लाभले नाहीत. असे प्रकार नित्याचेच बनल्याचा दावा गोमंतकीय महिला विपेत्यांनी केला.

तांबडी भाजी, मुळा, भेंडी यासारखी भाजी गोव्यात पिकत असल्याने गांधी मार्केटमध्ये ती बाहेरून आणू देऊ नये, अशी मागणीही एका इतर मागासवर्गीय महिला विपेत्याने उचलून धरली. पालिकेच्या मार्केट निरीक्षकांकडून या बेकायदा विपेत्यांकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले जात असल्याची टीका यावेळी करण्यात आली व यापुढे कारवाई न झाल्यास पालिकेसमोर उपोषणास बसण्याचा इशारा विपेत्यांकडून देण्यात आला. मुख्याधिकारी आग्नेल फर्नांडिस यांनी गोव्यात भाजीपाल्याची मुबलक प्रमाणात लागवड होत नसते, त्यामुळे परप्रांतियांवर विसंबून राहावे लागते, असे सांगितले. बेकायदा विपेत्यांवर कारवाई करण्याची मागणी रास्त असली, तरी परप्रांतियांकडून फळ-भाज्या आयात करणे बंद झाल्यास गोची होईल. त्यामुळे पालिका मंडळाला विश्वासात घेऊन कारवाईबाबत निर्णय घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Related Stories

सांतिइस्तेव्ह माशेल पुलाखाली इसमाचा निघृणरित्या खून

Amit Kulkarni

तिळारी कालव्यात अडकला गव्यांचा कळप

Amit Kulkarni

करमल घाटात ट्रक मातीत रूतून बंद पडला : 5 तास वाहतूक ठप्प

Amit Kulkarni

प्रतिदिन पाच तास पाणी देण्याचा प्रयत्न करणार

Amit Kulkarni

गिरीजाताई केळेकर संगीत संमेलन 4 व 5 रोजी फर्मागुडीत

Amit Kulkarni

वीज ट्रान्सफॉर्मर आगीच्या भक्षस्थानी पडण्यापासून वाचविण्यात यश

Amit Kulkarni