Tarun Bharat

मणप्पुरम गोल्डमध्ये चोरीचा प्रयत्न

सायरन वाजताच चोरटय़ाने केले पलायन

प्रतिनिधी/ बेळगाव

गणपत गल्ली येथील मणप्पुरम गोल्डमध्ये चोरीचा प्रयत्न झाला आहे. शटरचा कुलुप तोडताच सायरन वाजल्याने चोरटय़ाने तेथून पलायन केल्याची घटना घडली आहे. खडेबाजार पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.

मणप्पुरम गोल्डचे व्यवस्थापक प्रवीण शेट्टेण्णावर यांनी यासंबंधी खडेबाजार पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. नेहमीप्रमाणे गुरुवार दि. 18 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7 वाजता आस्थापनाला कुलुप लावून सर्व कर्मचारी घरी गेले होते. दि. 19 च्या मध्यरात्री 2 वाजता चोरीचा प्रकार घडला.

चोरटय़ाने शटरचा कुलुप तोडताच सायरन वाजले. याची माहिती केरळमधील मणप्पुरमच्या कार्यालयात समजली. त्यांनी शाखा व्यवस्थापकाशी संपर्क साधून गणपत गल्लीत चोरीचा प्रकार घडला आहे. तातडीने त्या ठिकाणी जा, असे सांगितले. व्यवस्थापकाने खडेबाजार पोलिसांशी संपर्क साधला. पोलीस दाखल होण्याआधीच चोरटय़ाने तेथून पलायन केले होते.

घटनेची माहिती समजताच खडेबाजारचे पोलीस निरीक्षक धीरज शिंदे व त्यांच्या सहकाऱयांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. चोरटय़ाचा प्रताप सीसीटीव्हीत कैद झाला असून चोरटा एकटाच असल्याचे फुटेजवरून उघडकीस आले आहे. दुसऱया मजल्यावर प्रवेश करताच चोरटय़ाने रॉडने कॅमेरा फोडला आहे. खडेबाजार पोलीस पुढील तपास करीत आहेत. 

Related Stories

आमदार आणि माजी महापौरांच्या कुटुंबातील सदस्यांना कोरोनाची बाधा

Tousif Mujawar

लोकमान्य टिळक दूरदृष्टीचे नेते

Omkar B

ढगाळ वातावरणामुळे वीट उत्पादक-मंजूर चिंतेत

Patil_p

अलतगा ब्रह्मलिंग देवस्थानची नूतन कार्यकारिणी जाहीर

Amit Kulkarni

खनगावचे सुपुत्र फ्लाईंग ऑफिसर म्हणून नियुक्त

Patil_p

खानापुरात शिक्षणमंत्री नागेश यांच्या हस्ते विज्ञान पार्क-गणित प्रयोगशाळेचे उद्घाटन

Amit Kulkarni