Tarun Bharat

मणेराजुरीतील खंडोबा ओढ्यावरील अरुंद पुलावरून दारूची वाहतूक करणारा ट्रक उलटला

मणेराजूरी /प्रतिनिधी

तासगांव – कवठेमहांकाळ राज्य महामार्गावर मणेराजुरीतील खंडोबा ओढ्यावरील अरुंद पुलावर लिकरचा ट्रक उलटला यामध्ये ट्रकचे मोठे नुकसान तर सुमारे बावन्न लाखाची लिकर दारु ओढयात पडली होती ; सुदैवाने जीवत हानी झाली नाही . बुधवारी पहाटे चारच्या दरम्यान हा अपघात झाला. या राज्यमार्गावर रखडलेला दीड किलोमीटर रस्ता आणखी किती नुकसान करणार? या रखडलेला रस्त्यावर तीन ते चार धोकादायक वळणे आहेत. यामध्ये गेल्या पाच वर्षात पंचवीस ते तीस जणांचा बळी गेला आहे.

याबाबत घटनास्थळावरून समजलेली अशी की पुण्याहून दारूची वाहतूक करणारा दहा चाकी ट्रक (MH09-C07893 ) कवठेमहांकाळ येथील सैनिक कॅन्टीनला चालला होता. परंतु मणेराजुरीतील खंडोबा ओढ्यावरील अरुंद पुलावरील उखडलेल्या रस्त्यावर या ट्रक चालकाचा ताबा सुटून हा ट्रक दहा फूट ओढयात पलटी झाला . यामध्ये चालक सुदैवाने बचावला. पण ट्रक पलटी झाल्याने वस्ती भागात पाणीपुरवठा करणारी ग्रामपंचायतीची पाईपलाईन फुटली. तसेच ट्रक पलटी झाल्याने ट्रकचे सुमारे एक लाखाचे नुकसान झाले. तर ट्रकमधील तेरा टन लिकर दारुचे बॉक्स ओढयात पडले.

घटनास्थळी तातडीने सरपंच सदाशिव कलेढोणे, सचिन जमदाडे, दामू पवार, ग्रामसेवक महादेव जाधव, क. महांकाळ कॅन्टीनचे मॅनेजर कोळेकर, पोलीस पाटील दिपक तेली, सुनिल पवार यांनी तातडीने धाव घेवून सैनिक कॅन्टीनचे बॉक्स बिहारी कामगाराच्या मदतीने दुसऱ्या टेम्पोमधून कवठेमहांकाळला रवाना केले.

तासगाव – कवठेमहांकाळ राज्य महामार्ग होवून तीन वर्षे पूर्ण झाले आहेत. परंतु मणेराजुरीजवळील खंडोबा ओढा ते पवार वस्ती पर्यंतचा दीड किलोमीटरचा रस्ता रखडला आहे. शेतकऱ्यांना जमीन अधिग्रहणाची भरपाई न मिळाल्यामुळे हा रस्ता रखडला असलचे समजते. त्यामुळे या दीड किमी रस्त्याची संपूर्ण दुर्दशा झाली आहे. या खराब रस्त्यामुळे अनेक जणांचे बळी गेले आहेत. त्यामुळे आणखी किती बळी गेल्यावर व नुकसान झाल्यावर प्रशासन जागे होणार असा प्रश्न वाहनधारक व ग्रामस्थ करीत आहेत.

Related Stories

हॉटेल चालकाने उकळतं पाणी ओतून केली 2 भिकाऱ्यांची हत्या

datta jadhav

सांगली : कोरोनाची लस सुरक्षितच; भिती न बाळगता लस घ्या : जिल्हाधिकारी

Archana Banage

बिहारप्रमाणे महाराष्ट्रात ओबीसींची स्वतंत्र जनगणना करा; छगन भुजबळांची मागणी

Archana Banage

आनेवाडी टोल नाक्यावर प्रचंड गोंधळ,स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांचा ठिय्या

Archana Banage

सत्ता सोडण्यापूर्वी ट्रम्प यांनी दिला चीनला धक्का

datta jadhav

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे निधन

datta jadhav