Tarun Bharat

मण्णूर प्रिमियर लीग क्रिकेट स्पर्धेत नाईट रायडर्स विजेता

वार्ताहर/ हिंडलगा

मण्णूर येथील दिग्विजय युथ क्लबतर्फे आयोजित मण्णूर प्रिमियर लीग-2020 (एमपीएल) क्रिकेट स्पर्धेत झालेल्या अंतिम सामन्यात नाईट रायडर्स मण्णूर संघाने दर्जेदार व अष्टपैलू खेळाचे दर्शन घडवत तुल्यबळ असलेल्या मण्णूर वॉरियर्स संघावर 28 धावांनी मात करत विजेतेपद पटकाविले. सामनावीर म्हणून नाईट रायडर्सच्या आकाश बेन्नाळकर तर मालिकावीर म्हणून वॉरियर्सचा खेळाडू नवीन बिरादार यांची निवड करण्यात आली.

शेवटपर्यंत रंगतदार व अटीतटीच्या झालेल्या अंतिम सामन्यात दोन्ही संघांकडून बहारदार खेळाचे प्रदर्शन झाले. प्रथम फलंदाजी करताना नाईट रायडर्स संघाने पहिल्या राऊंडमध्ये 99 धावा केल्या. त्याला प्रत्युत्तर देताना मण्णूर वॉरियर्सने 101 धावा करत दोन धावांची आघाडी घेतली. त्यानंतर झालेल्या दुसऱया राऊंडमध्ये नाईट रायडर्सने 82 धावा केल्या. त्यामुळे मण्णूर वॉरियर्ससमोर केवळ 80 धावांचे लक्ष्य होते. पण, गोलंदाजांच्या भेदक माऱयासमोर वॉरियर्सचा डाव केवळ 56 धावातच संपुष्टात आल्याने मण्णूर नाईट रायडर्सने वॉरियर्सवर 28 धावांनी विजय मिळविला. स्पर्धेत सनरायझर्स मण्णूर संघाने तृतीय क्रमांक पटकाविला. शिस्तबद्ध संघ म्हणून मण्णूर कॅपिटल किंग, उत्कृष्ट फलंदाज मयूर तरळे, उत्कृष्ट गोलंदाज श्रीधर चौगुले, उत्कृष्ट यष्टीरक्षक नवीन मंडोळकर, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून जोतिबा चौगुले यांची निवड करण्यात आली. सर्व विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख बक्षीस व मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. याशिवाय इतर पाच सहभागी मण्णूर कॅपिटल किंग्स, मण्णूर रॉयल किंग्स, मण्णूर सुपर किंग्स, न्यू इंडियन्स मण्णूर व रॉयल चॅलेंजर्स मण्णूर या संघांचाही स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. बक्षीस वितरण समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून पुरस्कर्ते व विठुमाऊली कन्स्ट्रक्शनचे संचालक शंकर सांबरेकर, अभियंते आर. एम. चौगुले, भाजप ग्रामीण माजी अध्यक्ष विनय कदम, भाजप नेते किरण जाधव, अभियंते अरुण कदम, सागर कटगेण्णावर, किरण चौगुले, ग्राम पंचायत माजी सदस्य दत्तू चौगुले, युवराज  काकतकर, भरमा आनंदाचे, अभिषेक काकतकर, महादेव डोणकरी, महेश बाळेकुंदी, तानाजी तरळे, पंच उमेश मजुकर, संघचालक वैभव कदम, सागर डोणकरी, विष्णू चौगुले, लक्ष्मण चौगुले, मधुकर चौगुले, अनिल काकतकर, संतोष केंचण्णावर, सुनील मंडोळकर, लक्ष्मण शहापूरकर, आप्पाण्णा चौगुले यांच्यासह क्रिकेटप्रेमी व ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते. बक्षीस समारंभाच्या अध्यक्षस्थानी क्लबचे अध्यक्ष सचिन चौगुले होते. सूत्रसंचालन संदीप कदम यांनी केले. वैजनाथ चौगुले यांनी आभार मानले. 

Related Stories

शहरात विविध ठिकाणी प्रजासत्ताक दिन साजरा

Amit Kulkarni

जीएसएस कॉलेजला एनसीसीमध्ये पुरस्कार

Amit Kulkarni

‘घरकुल’ने अनेकांच्या घरांचे स्वप्न केले पूर्ण

Amit Kulkarni

पहिल्या रेल्वेगेट येथे दुरुस्तीचे काम

Omkar B

विद्यार्थ्यांसाठी एसएसएलसीचा टप्पा भविष्यासाठी महत्वाचा

Patil_p

पदवीचे शिक्षण 1 सप्टेंबरपासून ऑनलाईन; ऑक्टोबरपासून वर्ग

Patil_p