Tarun Bharat

मण्यार’च्या विषाला सीपीआर’चा उतारा..!

दंश झालेल्या गडमुडशिंगीच्या तरूणाला सप्ताहभरानंतर मिळाले जीवदान.. `सीपीआर’मधील वैद्यकीय पथकाचे यश, सात दिवस व्हेंटिलेटर अन् ऑक्सिजनवर,सर्पदंशविरोधी औषध 1200 युनीट वापर

कोल्हापूर / कृष्णात पुरेकर

नागापेक्षाही पंधरा पट जहाल विषारी असलेल्या मण्यारने त्याला दंश केला, गडमुडशिंगीतील हा तरूण पॅरालिसीस, बेशुद्धावस्थेत सीपीआरमध्ये दाखल झाला, सप्ताहभरापुर्वी आलेल्या या रूग्णाला वैद्यकीय पथकाच्या अथक परिश्रम अन् औषधोपचारामुळे जीवदान मिळाले आहे. सप्ताहभर व्हेटिलेटरवरील या तरूणाला 1200 युनीट सर्पदंशविरोधी औषध दिले. त्यानंतर सोमवारी तो वॉर्डमधून फिरू लागला. सर्पदंशाच्या रूग्णांसाठी `सीपीआर’च वरदान असल्याचे सिद्ध झाले आहे.

करवीर तालुक्यातील गडमुडशिंगी येथील 22 वर्षीय तरूण. घरी आईवडील अन् बहीण, शेतातून घरी येताना सायंकाळी त्याला सर्पदंश झाला, घरी आल्यानंतर तो बेशुद्ध झाला, त्याला कुटुंबियांनी रात्री `सीपीआर’मध्ये दाखल केले. सर्पदंशाचे निदान होताच त्याच्यावर तातडीने उपचार सुरू झाले. त्याला पॅरालिसीसही झाला, सात दिवस व्हेंटिलेटरवर अन् आठव्या दिवशी तो ऑक्सिजनवर होता. या काळात त्याला डॉक्टरांनी 1200 युनीट (10 मिलि.चे 1 युनीट) एएसव्ही (अँटीस्नेक व्हिनेम) सर्पदंशविरोधी औषध दिले. अन् त्यातूनच तो सोमवारी बरा झाला आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील मेडीसीन विभाग प्रमुख डॉ. महेंद्र बनसोडे, डॉ. अनिता परितेकर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. कृष्णा, डॉ. नयना, डॉ. श्रीकृष्ण, डॉ. अनिरूद्ध, डॉ. शर्मिन यांच्या टीमचे अथक परिश्रम अन् त्यांना मदत करणाऱया स्टाफमुळे मण्यारने दंश केलेल्या तरूणाला पुनर्जीवन मिळाले आहे. सर्पदंशानंतर पॅरालीसीस अन् कोम्यातील या तरूणाला `सीपीआर’च्या वैद्यकीय पथकामुळे जीवदान मिळाले आहे.

मण्यारचा दंश अन् 24 तासांत होतो मृत्यू

मण्यार हा नागापेक्षाही जहाल असा विषारी साप आहे. सरीसृप वर्गात इलॅपिडी कुल, बंगारस प्रजातीत तो मोडतो. भारतात साधा मण्यार (सिरूलियस), पट्टेरी मण्यार (फॅसिएटस्), काळा मण्यार (नायगर) या जाती आढळतात. महाराष्ट्र, कर्नाटक, पश्चिम बंगालमध्ये साधा मण्यार आढळतो. त्याची लांबी 3 ते 4 फुट इतकी असते. पोलादी निळÎा रंगाचा अन् त्यावर सुमारे 40 पांढरे पट्टे असतात. पाठीवर मध्यभागी मोठÎा, षटकोनी खवल्यांची रांग असते.

गवत, झुडपात, पडक्या इमारतीत तो आढळतो. तो निचाचर आहे. अन्नासाठी रात्री बाहेर पडतो. लहान साप त्याचे मुख्य खाद्य. उंदीर, पाली, सरडे, बेडुकही त्याचे खाद्य आहे. मादी एप्रिल मे दरम्यान 12 ते 15 अंडी घालते. दीड, दोन महिन्यांनी त्यातून पिल्ले बाहेर पडतात. मण्यारचे विष नागाच्या विषाच्या 15 पट जहाल असते. त्याच्या विषग्रंथीतून एकावेळी 20 ते 100 मिलिग्रॅम विष टाकले जाते. यामध्ये बंगारोटॉक्सिन घटक असतो. सर्पदंशानंतर या घटकांमुळे रूग्णाच्या चेतापेशीतील संदेशवहन थांबते. बरगड्यांमधील स्नायूंवर परिणाम होऊन फुफ्फुसाचा स्ट्रोक, पक्षाघात होऊन मृत्यूचा धोका वाढतो. मण्यारचा दंश पटकन् लक्षात येत नाही, कारण दंश झालेल्या ठिकाणी वेदना होत नाहीत. त्याचे विषारी दात लहान असल्याने विष शरीरात पसरण्यास वेळ लागतो. पण दंशानंतर प्रचंड तहान लागते, पोटदुखी होऊन स्नायूंचा पक्षाघात जाणवतो. काही वेळात श्वास घेण्यास त्रास होऊन श्वसनसंस्था बंद पडल्याने 24 तासांत व्यक्तीचा मृत्यू ओढवतो. मण्यारच्या जातीनुसार योग्य प्रतिविष दिल्यास या रूग्णांना जीवदान मिळते, अशी माहिती वन विभागातून देण्यात आली.

Related Stories

शिंदे मंत्रिमंडळाचा विस्तार रखडणार?

Archana Banage

कोडोलीत लोकन्यायालय : ६४ दावे निकाली

Abhijeet Khandekar

शिवप्रतापाच्या आठवणीने प्रतापगड दुमदुमला

Patil_p

Anil Deshmukh Case : वैफल्यातून चौकशीचा ससेमिरा लावला जातोय – संजय राऊत

Archana Banage

नाशिकमधील गंजमाळ येथील भीमनगर झोपडपट्टी भागात भीषण आग

Archana Banage

कोरोना रक्षकांना वार्‍यावर सोडणार नाही : प्रभाकर घार्गे

Archana Banage