Tarun Bharat

मतदान केंद्रांवर सर्व व्यवस्था ठेवा

जिल्हाधिकारी डॉ. हरिषकुमार यांचे आवाहन

प्रतिनिधी/ बेळगाव

लोकसभा पोटनिवडणुकीची धामधुम सुरू झाली आहे. एकीकडे कोरोनाचा वाढता फैलाव आणि त्यात पोटनिवडणुकीची रणधुमाळी, यामुळे सर्वच अधिकाऱयांची धावपळ उडत आहे. बेळगाव तालुक्मयातही मोठय़ा प्रमाणात अनेक अधिकारी धावपळ करताना दिसत आहेत. महत्त्वाचे म्हणजे नूतन जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असलेले डॉ. हरिषकुमार यांनीही हिंडलगा येथे भेट देऊन संबंधितांना सूचना केल्या आहेत.

हिंडलगा येथील मतदान केंद्राला भेट देऊन त्यांनी संबंधितांना मतदान केंद्रांवर योग्य सुविधा नसल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला आहे. त्या ठिकाणी सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याकडे लक्ष द्यावे. प्रत्येक बुथमध्ये पिण्याचे पाणी, वीज, शौचालय तसेच इतर पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. याच बरोबर इतर सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करा, असे आवाहनही जिल्हाधिकाऱयांनी केले आहे.

सध्या निवडणुकीमध्ये अनेक अनधिकृत कामे करण्यात आल्याची माहिती मिळताच पोलिसांना ते तातडीने सांगा. मतदान केंद्रांवर कोरोनाचे नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न होण्याची गरज आहे. त्यामुळे सुरक्षित अंतर, मास्क, सॅनिटायझरचा वापर करण्याचे आवाहनही डॉ. हरिषकुमार यांनी केले आहे.

यावेळी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सर्व मतदान केंद्रांवर लक्ष देऊन त्या ठिकाणी सर्व सोयी-सुविधा उपलब्ध कराव्यात, असे त्यांनी म्हटले आहे. यावेळी तहसीलदार आर. के. कुलकर्णी, तलाठी दयानंद कुगजी, ग्राम पंचायत क्लार्क संतोष नाईक आदी उपस्थित होते.  

Related Stories

सांगली : शेगाव येथे सव्वा लाखाचा गांजा जप्त

Archana Banage

कर्नाटकात लवकरच धर्मांतरविरोधी कायदा होणार : बोम्माई

Archana Banage

…अन् विमानाचा फुटला टायर

Archana Banage

शिरोली दुमाला ग्रामपंचायतच्या वतीने 10 लाख किमतीच्या साहित्याचे वाटप

Abhijeet Khandekar

आम्ही सावंतवाडीकर व श्रीराम वाचन मंदिराच्यावतीने रक्षाबंधनाचे आयोजन

Anuja Kudatarkar

राज ठाकरे बुडताना किनाऱ्याकडे बघतील तेव्हा शिवसेना दिसेल- नीलम गोऱ्हे

Rahul Gadkar