Tarun Bharat

मतदारयादी विभाजनाचे काम युद्धपातळीवर

Advertisements

मनपात बीएलओंची बैठक : एक हजारहून अधिक मतदार असल्यास दोन मतदान बूथ करण्याची सूचना

प्रतिनिधी / बेळगाव

लोकसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारयाद्या तयार करण्याची सूचना करण्यात आली आहे. एक हजारहून अधिक मतदार असल्यास दोन मतदान बूथ करण्याची सूचना करण्यात आली आहे. त्यामुळे मतदार यादीतील त्रुटी दुरुस्त करून विभागणी करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. याकरिता सोमवारी महापालिका बीएलओंची बैठक घेण्यात आली होती.

कोरोना विषाणूची लागण होण्याची धास्ती असल्याने पोटनिवडणुकीत कोविड-19 च्या नियमावलीचे पालन करण्याचा आदेश निवडणूक आयोगाने दिला आहे. तसेच 1 हजारहून जास्त मतदार असलेल्या मतदान केंद्रातील मतदारांची विभागणी दोन बुथमध्ये करण्याची सूचना करण्यात आली होती. त्यामुळे महापालिकेच्या निवडणूक विभागाने दक्षिण आणि उत्तर मतदार संघांतील मतदान केंद्रांची यादी तयार केली आहे. दोन्ही मतदार संघात 197 मतदान केंद्रांवर 1 हजारहून अधिक मतदारांची संख्या आहे. त्यामुळे 197 मतदान केंद्रांतील मतदारांची विभागणी होणार आहे. एका मतदार यादीची विभागणी करून नव्या बुथमध्ये समावेश करण्यात येणार आहे. मात्र, त्याच केंद्रात मतदान असणार आहे. मतदान केंद्रांची विभागणी झाल्याने बूथची संख्या 394 होणार आहे.

प्रत्येक वॉर्डमधील मतदान केंद्रांची चाचपणी

मतदार यादीची विभागणी करण्याची जबाबदारी बीएलओंवर सोपविण्यात आली आहे. याबाबतची माहिती देण्यासाठी सोमवारी महापालिकेत बैठक आयोजित करण्यात आली होती. 1 हजारहून जास्त मतदार असलेल्या बूथमधील मतदारांची विभागणी करून वेगवेगळी मतदार यादी तयार करण्याची सूचना करण्यात आली. यावेळी सदर मतदार याद्या तयार करण्यात आल्या. मनपा महसूल निरीक्षकांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक वॉर्डमधील मतदान केंद्रांची चाचपणी करून मतदारांची विभागणी करण्यात आली. दक्षिण विभागात 102 मतदान केंद्रात 1 हजारहून अधिक मतदार आहेत. उत्तर विभागात 95 मतदान केंद्रांवर 1 हजारहून अधिक मतदार आहेत. यांची विभागणी करून मतदान बूथची संख्या वाढविण्यात आली. पोटनिवडणुका घेण्याच्यादृष्टीने आवश्यक तयारी सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर मतदार याद्या तयार करणे व बूथ स्थापन करण्याचे काम हाती घेतले आहे. ज्या केंदावर 1 हजारहून अधिक मतदार आहेत पण त्या ठिकाणी बूथची संख्या वाढविण्यासाठी इमारतीची कमतरता भासल्यास अन्यत्र स्थलांतर करण्याचा प्रस्ताव आहे. मतदान केंद्रापासून जवळच्या शाळेत अथवा सरकारी इमारतीमध्ये मतदान केंद्र स्थलांतर करण्याची शक्मयता आहे.

Related Stories

गोजगा-उचगाव संपर्क रस्ता गेला वाहून

Amit Kulkarni

विद्यार्थ्यांना जुना पास-शुल्क पावती दाखवून करता येणार प्रवास

Amit Kulkarni

आणखी किती दिवस अडचणीतून जायचे?

Patil_p

जमखंडी न्यायालयाकडून राज्य परिवहन बस जप्त

Patil_p

आर. एन. नायक खून खटल्यात पोलीस अधिकाऱयांची साक्ष

Omkar B

भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात विद्यार्थिनी जखमी

Amit Kulkarni
error: Content is protected !!