Tarun Bharat

मतदार यादी नोंदीसाठी व्होटर हेल्पलाईन ॲपचा वापर करा – जिल्हाधिकारी

प्रतिनिधी / सांगली

भारत निवडणूक आयोगाच्यावतीने निवडणूक प्रक्रियेचे बळकटीकरण व समाजभिमुखता वाढावी यासाठी सातत्याने नवनवीन उपक्रमांची अंमलबजावणी केली जाते. याचाच एक भाग म्हणून भारत निवडणूक आयोगाने मतदारांच्या मतदार यादीतील सर्व माहिती व नोंदीसाठी अद्ययावत असे व्होटर हेल्पलाईन ॲप विकसीत केले आहे. या ॲपचा उपयोग जिल्ह्यातील अधिकाधिक मतदारांनी करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.

सद्यस्थितीत भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 1 जानेवारी 2022 या अर्हता दिनांकावर आधारित जिल्ह्यात मतदार यादी संदर्भातील विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम राबविला जात आहे. या कार्यक्रमासाठी व्होटर हेल्पलाईन ॲपचा जास्तीत जास्त उपयोग जिल्ह्यातील नागरिकांनी करावा. व्होटर हेल्पलाईन ॲपमध्ये मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी नमुना फॉर्म नंबर 6, एकापेक्षा अधिक ठिकाणी असणारी नावाची नोंद किंवा मयत मतदाराचे नाव वगळण्यासाठी नमुना फॉर्म नंबर 7, तपशिलामध्ये काही त्रुटी असल्यास नमुना फॉर्म नंबर 8, विधानसभा मतदारसंघातर्गंत पत्ता बदलण्यासाठी नमुना फॉर्म नंबर 8अ भरून मतदारांना आवश्यक ती दुरूस्ती करता येईल. मतदारांनी व्होटर हेल्पलाईन ॲप डाउनलोड करून घ्यावे तसेच nvsp.com या संकेतस्थळाच्या माध्यमातून देखील आवश्यक तो फॉर्म भरण्याच्या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही चौधरी यांनी केले आहे.

Related Stories

बेंगळूर अजूनही ‘ऑक्सिजन’वर

Archana Banage

‘ ते ‘ चार पॉझिटिव्ह दुर्गमानवाडच्या विठ्ठलाई दर्शनासाठी येऊन गेल्याचे स्पष्ट

Archana Banage

बजरंग पुनिया उपांत्य फेरीत पराभूत

Patil_p

कर्नाटक: युजीईटीचा निकाल जाहीर

Archana Banage

संभाजीराजे अपक्ष लढले तर पाठिंबा नाही-संजय राऊत

Archana Banage

सांगली : ऊस हंगामाची सांगता ; शेतकऱ्यांना कोट्यावधीचा फटका

Archana Banage