Tarun Bharat

मतदार राजा आहे, आपल्या प्रयत्नांना यश येईल : फडणवीस

प्रतिनिधी /पणजी

लोकाशाहीत मतदार हा खरा राजा आहे. त्यामुळे आज सोमवार दि. 14 फेब्रुवारी रोजी गोवा विधानसभेसाठीच्या निवडणुकीत मतदारराजा सद्सदविवेकबुद्धीने मतदान करील. भाजप सरकारने गोव्याचा केलेला विकास पाहून मतदार भाजपलाच निवडून देतील आणि आमच्या प्रयत्नांना यश येईल, असा विश्वास महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते तथा गोवा भाजप निवडणूक निरीक्षक देवेंद फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

गोवा भाजपचा निवडणूक निरीक्षक म्हणून पक्षाने आपली नेमणूक केल्याने गोव्यातील निवडणुकीचा अनुभव घेण्याची संधी प्रथमच मिळाली. गेले तीन महिने गोव्याच्या जनतेशी आपण जवळून संवाद साधला. गोव्यातील दहा वर्षांच्या विकासकामाची माहिती घरोघरी पोहोचविण्यात आली. या विकासकामांबाबत गोमंतकीय जनतेत समाधान आहे, अशी आपल्याला प्रचिती आली. लोकांच्यापर्यंत पोहोचण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न केला. विकासकामांचा गोमंतकीय जनता जनार्दनाने योग्य विचार करुन मतदान करावे, असे भावनिक आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केले.

निवडणुकीदरम्यान अनावधनाने आमच्याकडून कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर त्यांच्या भावनांचा आम्ही आदर करतो आणि भविष्यात आपली भूमिका सकारात्मक घेण्याचा प्रयत्न करु, असेही फडणवीस म्हणाले. 

Related Stories

आल्तीनो येथे साबांखाच्या कामगारांचे धरणे

Amit Kulkarni

गुळे येथे अपघातात बळी गेलेल्या गुरांच्या मालकांना भरपाई द्यावी

Amit Kulkarni

मोसमाच्या पहिल्या दिवशी बहुतांश ट्रॉलर्स जेटीवरच

Amit Kulkarni

प्रा. उल्हास प्रभुदेसाईंसारखे इतिहास संशोधक तयार व्हावेत

Omkar B

मडगाव गांधी मार्केट बंद करण्याची पाळी

tarunbharat

रस्ता रूंदीकरणाला कुस्मणवासियांचा विरोध

Amit Kulkarni