Tarun Bharat

‘मतवाली मनचली कविताएँ’ या कवितासंग्रहाचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन

ऑनलाईन टीम / पुणे :  


‘मतवाली मनचली कविताएँ’ या कवितासंग्रहाचे प्रकाशन आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे करण्यात आले. 


उत्तराखंड येथील देवयानी मुंगली  यांच्या लेखनीतून साकारालेला ‘मतवाली मनचली’ कवितासंग्रहातील कविता लहान मुलांना शौर्याचे धडे देतात. कवितासंग्रह वाचनातून पुन्हा एकदा पुस्तकांच्या विश्वात रममाण व्हावे वाटत आहे. देवयानी मुंगली यांच्या कविता मनाला भावणाऱ्या आहेत. लहान मुलांसाठी हा कवितासंग्रह वाचनीय असल्याचे सांगतानाच येणाऱ्या कालावधीत आणखी चांगल्या रचना देवयानी यांच्या लेखनीतून पुढे येतील, असा विश्वास राज्यपाल कोश्यारी यांनी व्यक्त केला. 


प्रास्ताविक प्रणित मुंगली यांनी तर आभार देवयानी मुंगली यांनी मानले. यावेळी संस्कृती परिवारातील सदस्य तसेच नागरिक उपस्थित होते.

Related Stories

श्रीकांत देशमुख यांच्यावर पुण्यातही गुन्हा

datta jadhav

ज्येष्ठ विधिज्ञ भास्करराव आव्हाड यांचे पुण्यात निधन

Tousif Mujawar

कसबा विधानसभेसाठी मनसेही रिंगणात?

datta jadhav

संभाजी ब्रिगेडचे रौप्य महोत्सवी अधिवेशन पुण्यात

datta jadhav

संजय शिरसाटांकडून उद्धव ठाकरेंचा ‘कुटुंबप्रमुख’ म्हणून उल्लेख करत ट्वीट; नाराजी नाट्यावर दिलं स्पष्टीकरण

Archana Banage

रंगकर्मींच्या प्रश्नांसंदर्भात टास्क फोर्सशी चर्चा करुन निर्णय घेणार – अमित देशमुख

Archana Banage