Tarun Bharat

मतांच्या जोगव्यासाठी अपप्रचार

Advertisements

मतदारांना विविध आमिषे दाखविण्याचा प्रकार : विरोधक बिथरले

प्रतिनिधी / बेळगाव

महापालिका निवडणुकीत राष्ट्रीय पक्षांसह अन्य अपक्षांनीदेखील उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. मात्र म. ए. समितीने विविध वॉर्डांमध्ये अधिकृत उमेदवारांची घोषणा केली आहे. म. ए. समिती उमेदवारांचा विजय निश्चित आहे. त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरल्याने अपप्रचार करण्यास प्रारंभ केला आहे. तसेच मतदारांना विविध आमिषे दाखविण्याचा प्रकारही सुरू असून काही वॉर्डांमध्ये विद्युतदिव्यांची उभारणी करून मतदारांचे मन परिवर्तन करण्याचा आटापिटा सुरू आहे.

बेळगाव महापालिकेतील मराठी भाषिकांची सत्ता रोखण्यासाठी हरेकप्रकारे प्रयत्न सुरू आहेत. काही वॉर्डांमध्ये म. ए. समिती अधिकृत उमेदवारांच्या विरोधात मराठी भाषिक उमेदवार उभे करून मते फोडण्याचा प्रयत्न सुरू आहे. तसेच काही वॉर्डांमध्ये मतदारांच्या समस्यांचे निवारण करून मते मिळविण्याचा आटापिटा करण्यात येत आहे. काही वॉर्डांमध्ये रात्रीत कूपनलिकांची खोदाई तर काही वॉर्डांमधील रस्त्यांचे डांबरीकरण करण्याचा सपाटा सुरू आहे. काही वॉर्डांमध्ये मतदारांना खरेदी करण्याचा प्रकारही सुरू असल्याचे निदर्शनास आले
आहे.

राजश्री हावळ यांनाच विजयी करा

वॉर्ड क्र. 31 मधून म. ए. समितीच्या अधिकृत उमेदवार राजश्री नंदकुमार हावळ निवडणूक लढवित आहेत. मात्र वॉर्डमधील काही अन्य उमेदवारांनी अपप्रचार चालविला असून मीच अधिकृत उमेदवार असल्याचे सांगून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रकार सुरू आहे. विरोधकांच्या आमिषाला किंवा दबावाला बळी न पडता राजश्री नंदकुमार हावळ यांनाच आपले बहुमोल मत देऊन विजयी करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Stories

तरुणाने मोडले तब्बल 72 वेळा वाहतूकीचे नियम

Patil_p

कर्नाटकः १०० वर्षाच्या वृद्ध महिलेची कोरोनावर मात

Abhijeet Shinde

सावित्रीच्या लेकी लढतच आहेत….

Amit Kulkarni

सुळगा येथे आजपासून पाच दिवस सीलडाऊन

Patil_p

राजर्षी शाहू महाराज जयंती निलजी येथे साजरी

Amit Kulkarni

लोकमान्य मिलिटरी टेनिंग अकॅडमीच्या नव्या बॅचसाठी नावनोंदणी

Patil_p
error: Content is protected !!