Tarun Bharat

मदतीसाठी सरसावला माजी विद्यार्थी संघ

Advertisements

सेंट मेरीज शाळेच्या 2011-12 बॅचच्या मानवता फौंडेशनचा कोरोनाकाळात स्तुत्य उपक्रम

प्रतिनिधी / बेळगाव

शिक्षण पूर्ण झाल्यानंतर शाळा सुटली तरीही शाळेशी आपला संबंध रहावा, या हेतूने अनेक शाळांमधील माजी विद्यार्थ्यांनी विद्यार्थी संघ स्थापन केले आहेत. हे संघ कोरोनाकाळात अनेक गरजू लोकांच्या मदतीसाठी पुढे आले असून उत्तम कार्य करत आहेत. यापैकीच एक संघ म्हणजे सेंट मेरीज शाळेचा 2011-12 चा संघ होय.

कोरोनाकाळात अनेकजण समाजकार्य करत आहेत. त्यापासून प्रेरणा घेऊन या बॅचचे विद्यार्थी एकत्र आले. त्यांनी स्वतःच पैसा जमा केला आणि त्यातून गेल्या पंधरा दिवसांपासून अनेकांना विनामूल्य भोजन देत आहेत. यासाठी त्यांना अनेकांचे अर्थसाहाय्यही लाभले. आरपीडी कॉर्नरवरील पोलीस तसेच अन्य ठिकाणी उभे असणारे पोलीस, रस्त्यावर दिसणारे गरीब आणि गरजू याशिवाय लोटस, बिम्स, केएलई, वेणुग्राम, लेकव्हय़ू येथील रुग्ण आणि नातेवाईकांना व महामार्गावरील गरजू लोकांना त्यांनी भोजन दिले आहे.

या संघाने यापुढेही समाजकार्य करण्याचे ठरविले आहे. त्यासाठी या संघाला त्यांनी ‘मानवता फौंडेशन’ असे नाव दिले आहे. भोजन तयार करण्यासाठी त्यांनी स्वतः एक स्वयंपाकी नेमला असून त्याच्याकडून तयार झालेले भोजन पॅकबंद करून ते उपरोक्त संस्थांना पोहोचवितात. यासाठी सनी व सचिन तेलसंग, कार्तिक बड्डे, भीमसेन पप्पू, सुशांत जोथावर तसेच अभिषेक, सुदर्शन, सूरज, प्रीतम, सुमित, चंदू, रोहन, रौनक, शुभम, संकेत, रघू, चेतन, आदित्य, देवेंद्र, प्रवीण, विजयराज, सागर, रितेश, प्रसन्न व ओंकार हे माजी विद्यार्थी पुढाकार घेत आहेत.

या फौंडेशनने सायंकाळच्यावेळी पोलिसांनाही चहा आणि बिस्किट वाटप सुरू केले आहे. कडक लॉकडाऊनवेळी ऑटोनगर व झोपडपट्टी परिसरात त्यांनी भोजन वितरित केले. यापुढे कोणत्याही नैसर्गिक आपत्तीवेळी आपले फौंडेशन मदतीसाठी पुढे येईल, असे कार्तिक बड्डे यांनी सांगितले.

Related Stories

तुटवडा असल्याचे सांगून चारपटदराने भाजीपाला विक्री

Patil_p

नाला ओव्हरफ्लो झाल्याने आनंदनगरमधील रस्ते गायब

Patil_p

घरोघरी गौरीच्या जेवणाचा थाट

Amit Kulkarni

खानापुरातील दोन मुले नाल्यात बुडाल्याचा संशय

Patil_p

पर्यावरणाला हात न लावता पर्यटनवाढीस प्रयत्न

Patil_p

वैश्यवाणी समाजातर्फे कोजागरी पौर्णिमा

Amit Kulkarni
error: Content is protected !!