Tarun Bharat

मदन भोसलेंनी भ्रष्टाचारातून प्रचंड पैसा कमावला

आमदार मकरंद पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांचा मदन भोसले यांच्यावर घणाघाती आरोप

प्रतिनिधी/ सातारा

किसना वीर काखान्यावर 750 कोटीचा बोजा आहे. प्रतापगड आणि खंडाळा कारखाना 18 वर्षाची चालवण्याची जबाबदारी किसन वीर कारखान्याची आहे. त्यामुळे सगळे मिळून 1 हजार कोटींचा बोजा आहे. सध्या कारखान्याकडे साखर शिल्ल्मोलायसेस, बगॅस, अल्कोहोल असे काहीच शिल्लक नाही. म्हणजेच हा पैसा गेला कुठे?, मदन भोसले यांनी यात अपहार केल्याशिवाय हा पैसा गेला कुठे?, हा शेतकऱयांच्या खिशात पैसा गेला नाही. हा पैसा कोणाच्या खिशात गेला?, 100 ंटक्के मदन भोसले यांनी प्रचंड अपहार केला आहे. प्रचंड संपत्ती कमवली त्यांनी म्हणून कारखान्याची दयनिय अवस्था झालेली आहे, असा आरोप जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांनी कारखान्याचे चेअरमन मदन भोसले यांच्यावर केला आहे. दरम्यान, हा कारखाना शेतकऱयांच्या विश्वासावर पुन्हा उर्जित अवस्थेत आम्ही आणू असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

 शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषद ते बोलत होते. यावेळी विद्यमान शेतकरी बचाव पॅनेलमधील मान्यवर उपस्थित होते. आमदार मकरंद पाटील म्हणाले, किसन वीर कारखान्यावर प्रचंड कर्ज आहे. कारखान्याची केलेली दुरवस्था यावर आम्ही विचार केला. आज ही शेतकऱयांच्या शेतात 5 लाख टन तसाच ऊस उभा आहे. काही बाहेरचे कारखाने बोलवून किसन वीरच्या कार्यक्षेत्रात ऊस नेण्याचे प्रयत्न सुरु आहेत. गेल्या वर्षीचे पमेंट दिलेले नाही. कोरोना काळात शेतकऱयांना अडचणींचा सामना करावा लागला. त्यावेळी त्या पेमेंटची गरज होती. या सगळया बाबींचा विचार करुन आम्ही कारखान्याची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. एका बाजूला कर्जाचा डोंगर तर दुसऱया बाजूला कारखान्यात साखर नाही. अल्कोहोल नाही, बगॅस नाही. कारखान्याची दैनंदिन गाळप क्षमता 4 हजार मेट्रिक टन आहे. तीन डिस्टलरी प्रकल्प आहेत. एक तात्या चेअरमन असताना कार्यरत करण्यात आला होता. पाच तालुक्याचे कार्यक्षेत्र असलेला हा कारखाना आहे. महाराष्ट्र ऊस नसल्याने कारखाने बंद पडतात. परंतु हा कारखाना ऊस असून बंद पडलेला आहे. 15 लाख मेट्रीक टन ऊस आहे. कारखाना चेअरमनच्या गलथान कारभारामुळे, एकाधिकार शाहीमुळे, भ्रष्टाचारामुळे हा कारखाना बंद पडला आहे, असा आरोप आमदार मकरंद पाटील यांनी केला.

कारखाना उभा करण्यात लक्ष्मण तात्यांचे योगदान

 हा कारखाना राजकीय आणि शेतकऱयांचे आर्थिक परिवर्तन करणारा वैभव होत. परंतु आज अडचणीत आहे, असे सांगत आमदार पाटील म्हणाले, हा कारखाना उभा करण्यामध्ये आबासाहेब वीर यांच्याबरोबर लालसिंगराव शिंदे, डी.बी.कदम, लक्ष्मण पाटील त्यांच्या अनेक सहकार्याचे योगदान आहे. आज चुकीच्या व्यवस्थापनाच्या ताब्यात कारखाना गेला. त्यांनी कारखान्यातील कामगारांचा 22 महिन्यांचा पगार दिला जात नाही. कामगारांच्या बायका रोजाने भांगलायला जात आहेत. त्यामुळे आम्हाला खात्री आहे की कारखान्याचे सभासद आमच्या ताब्यात दिल्याशिवाय राहणार नाही, असे सांगितले.

  कारखान्याला उर्जित अवस्था आणली जाणार

निवडणूक जिंकल्यानंतर किसन वीर कारखान्याला उर्जित अवस्था आणण्याचा प्रयत्न केला जाईल. त्याकरता दिलेल्या प्रत्येक उमेदवारांना पार्श्वभूमी आहे. रामराजे, शिवेंद्रराजे, शशिकांत शिंदे अशा सगळ्या मंडळीशी चर्चा करून पॅनेलचा निर्णय घ्यायचा आहे. जयंत पाटील यांनीही मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. कारखाना कुठल्या महिन्यात सुरु होतो. आता मजूर परतायला लागतात. हा कारखाना एप्रिलमध्ये सुरु झालेला आहे. आज कारखान्याचे गाळप बघा 400 ते 500 मेट्रिक टन होत आहे. तोटा वाढायला लागला आहे. अंडर कपॅसिटी गाळप होत असेलस तर कारखान्याचा तोटा आहे. आज कारखान्यात बगॅस नाही. तीन दिवस झाले बैलगाडी भरुन गेलेल्या बैलगाडय़ा बाहेर होत्या. शेतकऱयांनी दंगा केला तेव्हा आतमध्ये घेतल्या. अजूनही गाळप नाही त्यांचे, असे ही त्यांनी सांगितले.

अमित शहा यांना भेटायला जायचे नाटक आहे

कारखान्याला वाचवायचे असेल तर आताच का अमित शहा आठवले. यापूर्वी का अमित शहांना भेटला नाही. हे एक नाटक आहे, असा आरोप करत नितीन पाटील म्हणाले, कारखान्यात ऊस नाही. बॅगस नाही, डिस्टलरी नाही. पैसा गेला कुठे?, मदन भोसले यांनी भ्रष्टाचार केला अन् संपत्ती कमवली असा आरोप केला. कारखान्याच्या नऊ बँकांची कर्जे आहेत, असेही त्यांनी सांगितले. तसेच चेकचा ढिगारा लागला आहे. दिलेले चेक बाँऊस होत आहेत, असाही आरोप त्यांनी केला.

मदन भोसले यांच्या गटातील आजीमाजी संचालकांचा प्रवेश

किसन वीर कारखान्याच्या निवडणूकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आमदार मकरंद पाटील यांच्या विचारांने प्रेरीत होवून आमदार मदन भोसले यांच्या गटातील विद्यमान संचालक सचिन साळुंखे यांच्यासह माजी संचालक संदीप पोळ, राहुल घाडगे, माजी संचालक कुमार बाबर,किक ली,  अन त्यांचे कार्यकर्ते यांनी आमच्या पॅनल यांनी जाहीर राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. त्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.

Related Stories

पोलीस अधीक्षक ऍक्शन मोडवर

Patil_p

जालन्यातील बेपत्ता पोलीस अधिकारी खंडाळ्यात सापडले

Patil_p

संजय धुमाळांवर विनयभंगाचा गुन्हा

Patil_p

दारू पिऊन घर पेटवणाऱयाला 3 वर्ष सक्तमजुरी

Patil_p

कॅलिफोर्नियाहून आलेल्या त्या रुग्णाचा पहाटे मृत्यू ; रात्री आला होता निगेटिव्ह रिपोर्ट

Archana Banage

कोरोना योद्धा कर्मचाऱ्यांचे आमरण उपोषण

datta jadhav