Tarun Bharat

मदिरालयाचे नव्हे तर मंदीराची दारे ठाकरे सरकारने उघडावीत

प्रतिनिधी / तुळजापूर

तुळजापूर – मदिरालयाचे नको तर भक्ती व श्रध्देचे चे  उध्दवा दार उघड  !!! असा जागर  करीत मुख्यमंत्री ठाकरे यांना राज्यातील मंदीरांचे दारे उघडे करण्यासाठी देविने  सदबुध्दी द्यावी. असे साकडे घालत मंदीराचे दारे जो पर्यत ठाकरे सरकार उघडण्याचा निर्णय जाहीर केला जात नाही व  प्रतिनिधीक स्वरुपात साधुसंतान दर्शन दिले जात नाही. तोपर्यंत हे ठिय्या आंदोलन मागे घेणार नसल्याचा इषारा भाजपा अधात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक् आचार्य ष तुषार भोसले यांनी यावेळी दिला.

महाराष्ट्राचीकुलस्वामीनीश्रीतुळजाभवानी मातेचे मंदीर खुले करण्यासाठी भाजपा अधात्मिक आघाडीचा वतीने गुरुवार  दि 5 रोजी  श्रीतुळजाभवानी मंदीर समोर राज्यातील मंदीरे सुरु करण्यासाठी साधुसंतपुजारी भक्त वृदांनी  ठिय्या आंदोलनास  आरंभ केला. यावेळी ते बोलत होते. यावेळी श्रीतुळजाभवानी परिसरात प्रचंड पोलिस बंदोबस्त तैनात केला होता.मंदीर परिसरास अक्षरशा छावणीचे स्वरुप प्राप्त झाले होते.

यावेळी बोलताना भाजपा अधात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले म्हणाले कि महाराष्ट्रातील मंदीरे सुरु करण्यासाठी शाषणाकडे निवेदन देवुन आंदोलन केले  पण संवेदना हीन महाआघाडी सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले. मंदीरे उघडे करण्या बाबतीत आम्ही साधुसंताशी मुख्यमंत्री उदव ठाकरे यांनी चर्चा करावी असे आवाहन केले होते. पण सरकार साधुसंताशी चर्चा केली नाही ते साधुसंताला घाबरले.

शेवटी आमच्या व्यथा कुठे मांडायाचा म्हणून आम्ही  आम्ही देवीदारीआलो व तिलाच आता विनंती करतो कि दारउघड बये दार उघड मंदीराचे दारे या सरकारने लावली आहेत भक्तांना देविदर्श न घेण्याची इछा आहे. यात अडथळा ठाकरे सरकार आणत आहे.निवडणुका आल्या कि जयभवानी म्हणायाचे व तिचेच दारे बंद ठेवायाचे हा कुठला न्याय असा सवाल करुन कालपासुन स्विमिंग पुल चिञपट गृह सुरु केले येथे कोरोना पसरत नाही का मग मंदीरात दोन मिनिटे दर्शन घेतले की कोरोना होतो का असा सवाल यावेळी केला.
यात आ राणाजगजितसिंहपाटील जिल्हाअध्यक्ष नितीन काळे नगराध्यक्ष सचिन रोचकरी विनोद गंगणे आनंद कंदले संतोष बोबडे सह साधुसंत पुजारी व्यापारी भाजपा पदाधिकारी मोठ्या संखेनेउपस्तीत होते.

Related Stories

चार वर्षांपासून वीजेची वाट पाहणाऱ्याला आले वीज बिल, मात्र वीज नाही….

Archana Banage

सदाभाऊ खोत करणार नव्या पक्षाची स्थापना

prashant_c

टाळेबंदीनंतर प्रथमच पंढरपूरची कार्तिकी यात्रा भरणार

Archana Banage

सोलापूर : बार्शीतील भाजीपाला, फळ विक्रेत्याची कोरोना टेस्ट होणार

Archana Banage

मैफलीतून उलगडला डॉ. सरोजिनी बाबर यांचा लोकसाहित्याचा समृद्ध खजिना

prashant_c

उपरी येथे ट्रॅक्टरच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू

Archana Banage