Tarun Bharat

‘वृत्तपत्राचा केक’ वाढदिवसाला अनोखी भेट …!

होय, हा केकच आहे….

प्रतिनिधी /बेळगाव

बेळगाव होम बेकर्सनी पुनः एकदा दाखवून दिले आहे की केक बनवण्याची क्रिएटिव्हिटी आवडीच्या बाबतीत ते इतर कोणत्याही शहराच्या बरोबरीने आहेत. असाच एक केक चक्क ‘तरुण भारत’ या वर्तमान पेपरच्या प्रतिकृतिचा करण्यात आला. त्यामुळे सोशल मिडियावर हा केक कुतुहलाचा विषय बनला आहे.

‘तरुण भारत’चे ज्येष्ट पेपरएजंट मधुकर श्रीधर देशपांडे यांचा वाढदिवस दि. 21 डिसेंबर रोजी साजरा करण्यात आला. विशेष म्हणजे यानिमित्त बुधवारपेठ येथील अर्चना देशपांडे यांनी ‘तरुण भारत’च्या प्रतिकृतीचाच केक तयार केला होता. या केकच्या प्रतिकृतीमुळे देशपांडे परिवारामध्ये आनंदमयी वातावरण निर्माण झाले. विशेष म्हणजे मधुकर यांनी ‘तरुण भारत’ अक्षरे असलेला वरचा थर न कापता बाजूला काढून उर्वरित केकचे कटिंग केले. मधुकर यांच्या दिवसाची सुरूवातच वृत्तपत्राने होते. त्यामुळे मधुकर यांच्या वाढदिवसानिमित्त वृत्तपत्राशी नाते सांगणारा केक तयार करणे औचित्यपूर्ण ठरले.

Related Stories

तालुक्यातील 63 हजार जनावरांच्या कानांवर टॅग

Patil_p

जि. पं. क्षेत्रामध्ये खरेदी केंद्र सुरू करा

Patil_p

पथदीपांसाठीच्या विद्युतवाहिन्या फूटपाथवर

Amit Kulkarni

‘त्या’ मांत्रिकाने लाटली होती 6 कोटींची मालमत्ता!

Tousif Mujawar

स्वच्छतेसाठी वॉर्डस्तरीय अधिकारी-कंत्राटदारांची यादी जाहीर

Amit Kulkarni

बेळगुंदी ग्रामपंचयतीमध्ये 54 उमेदवार रिंगणात

Patil_p