Tarun Bharat

मध्यप्रदेशात शिवराज सरकार तरणार!

मतदानोत्तर सर्वेक्षणाचा निष्कर्ष : 16-18 जागा भाजप जिंकण्याची शक्यता

वृत्तसंस्था / भोपाळ

मध्यप्रदेशात विधानसभेच्या 28 जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकांच्या मतदानोत्तर सर्वेक्षणाचे निष्कर्ष समोर आले आहेत. एका वृत्तवाहिनीच्या सर्वेक्षणानुसार भाजपला 16 ते 18 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसला 10 ते 12 जागांवर विजय मिळू शकतो. अन्य पक्षांमध्ये बसपला 1 जागा मिळण्याचा अनुमान व्यक्त करण्यात आला आहे.

मतदानोत्तर सर्वेक्षणाच्या अनुमानांनुसार पोटनिवडणुकांमध्ये भाजपला 46 टक्के तर काँग्रेसला 43 टक्के मते मिळू शकतात. विशेष बाब म्हणजे पोटनिवडणुकीला सामोरे गेलेल्या 28 जागांपैकी 27 ठिकाणी काँग्रेसचे आमदार होते. म्हणजेच पोटनिवडणुकीत काँग्रेसला 15 ते 17 जागांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.

मतदानोत्तर सर्वेक्षणानुसार मध्यप्रदेशात शिवराज सिंग चौहान सरकारला विधानसभेत सहजपणे बहुमत प्राप्त होणार आहे. भाजपला बहुमतासाठी 28 पैकी 9 जागा जिंकणे आवश्यक आहे. 10 नोव्हेंबर रोजी या पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.

इंडिया टुडे-ऍक्सिस माय इंडियानुसार शिवराज सिंग चौहान यांचे सरकार पूर्णपणे सुरक्षित राहणार असले तरीही ज्योतिरादित्य सिंधिया यांना मोठा झटका बसू शकतो. काँग्रेस नेते कमलनाथ यांना या पोटनिवडणुकीत काही प्रमाणात यश मिळू शकते. काँग्रेस सोडून भाजपमध्ये दाखल झालेल्या काही सिंधिया समर्थकांना या पोटनिवडणुकीत झटका बसण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्रिपदासाठी शिवराज सिंग चौहान यांनाच पहिली पसंती मिळाली असली तरीही कमलनाथ त्यांच्याहून अधिक मागे नाहीत. मुख्यमंत्रिपदासाठी शिवराज यांना 46 टक्के तर कमलनाथ यांना 43 टक्के लोकांनी पसंती दर्शविली आहे.

मध्यप्रदेश विधानसभेत एकूण 230 जागा असून यातील 29 जागा रिक्त आहेत. यातील 28 जागांकरिता पोटनिवडणूक होत आहे. याचमुळे एकूण 229 जागांच्या आधारावर बहुमताचा आकडा 115 असणार आहे. अशा स्थितीत भाजपला बहुमताचा आकडा गाठण्यासाठी केवळ 9 जागांवर यश मिळवावे लागणार आहे. तर काँग्रेसला सर्व 28 जागा जिंकाव्या लागतील. सद्यकाळात भाजपचे 107 आमदार आहेत, तर काँग्रेसचे 87, अपक्ष 4 आणि बसपचे 2 तर सपचा एक आमदार आहे.

सिंधियांसमोरील आव्हान

ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यासाठी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची ठरली आहे. 4 वेळा लोकसभा खासदार राहिलेल्या सिंधिया यांच्या गटातील 22 आमदारांनी राजीनामा दिला होता. या 22 जणांना पुन्हा निवडून आणण्याचे आव्हान सिंधिया यांच्यासमोर आहे. 22 पैकी 16 मतदारसंघ ग्वाल्हेर आणि चंबळ भागातील असून तेथे सिंधिया परिवाराचा मोठा प्रभाव राहिला आहे.

Related Stories

Asani चक्रीवादळ आंध्रच्या किनारपट्टीच्या दिशेने; मार्गात बदल

Archana Banage

काही पदार्थांची सुटी विक्री जीएसटीमुक्त

Patil_p

‘सतलज’मध्ये सापडली पाकिस्तानी बोट

Patil_p

चिमणपुऱयातला पॉझिटीव्ह युवक फिरतोय गरगरा

Patil_p

प. बंगालमध्ये हिंसाचार अन् जंगलराज – राज्यपाल

Abhijeet Khandekar

नेते घेताहेत धर्माचा आसरा

Patil_p