Tarun Bharat

मध्यप्रदेश : काँग्रेस आमदार राहुल सिंह लोधींचा भाजपात प्रवेश

Advertisements

ऑनलाईन टीम / भोपाळ : 

मध्यप्रदेशातील काँग्रेस आमदार राहुल सिंह लोधी यांनी रविवारी काँग्रेसचा राजीनामा देत भाजपात प्रवेश केला. हंगामी अध्यक्ष रामेश्वर शर्मा यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारल्याची माहिती दिली. 

मध्यप्रदेशातील 28 विधानसभा मतदारसंघात 3 नोव्हेंबरला पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीला 8 दिवस राहिले असतानाच लोधी यांनी पक्षाला रामराम ठोकला. रविवारी सकाळी लोधी यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला. त्यानंतर तासाभरातच ते भाजप कार्यालयात पोहचले. त्यानंतर मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपात प्रवेश केला. 

लोधी हे दामोह विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदाच निवडून आले आहेत. भाजपचे जयंत मलैया यांचा त्यांनी पराभव केला होता. मध्यप्रदेशात आतापर्यंत 26 काँग्रेस आमदारांनी राजीनामा दिला आहे. राजीनामा दिलेले आमदार हे जोतिरादित्य शिंदे यांचे समर्थक मानले जातात. 

Related Stories

अपक्ष आमदारांना मत दाखवता येणार का?; केंद्रीय निवडणूक आयोगानं दिलं स्पष्टीकरण

Abhijeet Shinde

सोने-चांदी दरात पुन्हा घसरण

Patil_p

नवरात्रोत्सवाला आजपासून प्ररंभ

Abhijeet Shinde

लसीकरण धोरणाची झाडाझडती

Patil_p

विरोधकांचे तोंड म्हणजे गटार- संजय राऊत

Abhijeet Shinde

9 वी आणि 11 वी च्या विद्यार्थ्यांना परिक्षेविनाच उत्तीर्ण करणार : शिक्षण विभागाचा निर्णय

Rohan_P
error: Content is protected !!