Tarun Bharat

मध्यप्रदेश : राज्यसभा निवडणुकीत सहभागी झालेले भाजपचे आमदार कोरोना पॉझिटिव्ह

Advertisements

ऑनलाईन टीम / भोपाळ : 


मध्य प्रदेशातील नीमच जिल्ह्यातील जावद विधानसभेेेतील भाजपचे आमदार ओमप्रकाश सकलेचा यांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. ते 16 जून पासून भोपाळमध्येच आहेत आणि त्यांनी शुक्रवारी झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत मतदान देखील केले होते. त्यांच्या कुटुंबातील अजून एका सदस्यास कोरोनाची बाधा झाली असल्याचे समोर येत आहे. 


या बातमीमुळे मध्यप्रदेशात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कारण राज्यसभा निवडणूकी दरम्यान, त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेतला जात आहे. जावदमधील आमदार सकलेचा रहात असलेला परिसर पहिल्यापासूनच कॅन्टोन्मेंट म्हणून घोषित केला गेला होता. सकलेचा हे मागील काही दिवसांपासून त्यांच्या फार्म हाऊसवरच राहत होते. मागील काही दिवसात ते अनेकांच्या संपर्कात आले असून त्यांनी भाजपच्या बैठकीला देखील हजेरी लावली होती. 


सकलेचा कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर विधानसभा सचिवालयाने राज्यसभा निवडणुकीच्या मतदानाचे फुटेज काढण्याचे आदेश दिले आहेत. त्याबरोबरच राज्यातील बालघाटा जिल्ह्यात आणखी दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. 


दरम्यान, सकलेचा यांचे सहकारी असलेल्या पाच आमदारांनी तात्काळ जेपी हॉस्पिटलमध्ये जाऊन स्वतःची कोरोना टेस्ट करून घेतली आहे. 

Related Stories

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ होणार ‘हायटेक’

Patil_p

2 हजार रुपयांचे टोकन, लोकांची फसवणूक

Amit Kulkarni

प्रत्यक्ष करांच्या संकलनात विक्रमी वाढ

Patil_p

एमक्यू-9ए रीपर ड्रोनची होणार खरेदी

Omkar B

राज्यपाल कोश्यारींना न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी नोटीस

Tousif Mujawar

संजय राऊतांवरच्या कारवाईवरचा मुद्दा मोदींसमोर मांडला- शरद पवार

Archana Banage
error: Content is protected !!