Tarun Bharat

मध्यप्रदेश : वीज बीलाच्या त्रासाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

Advertisements

ऑनलाईन टीम / छतरपूर : 


मध्यप्रदेशातील एका शेतकऱ्याने वीज बीलाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. 


पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव मुनेंद्र राजपूत असे असून तो 35 वर्षांचा होता. वीज बील भरू न शकल्याने ऊर्जा कंपनीने त्याची गिरण आणि मोटासायकल जप्त केली होती. दरम्यान, पोलिसांनी या घटनेची तक्रार घेतली असून या संदर्भात चौकशी केली आहे. 


मुनेंद्रचे भाऊ लोकेंद्र राजपूत यांनी सांगितले की, त्यांच्या भावाने सुसाईट नोटमध्ये लिहिले होते की, सरकारने त्याच्या शरीराचे भाग विकून वीज बिलाचे पैसे वसूल करावेत. पोलिसांना देखील सुसाईट नोट पाहिली आहे.

लोकेंद्र यांनी सांगितले की, लॉकडाऊन संपल्यानंतर देखील मुनेंद्र यांचा व्यवसाय चालत नव्हता. तसेच मुनेंद्र यांनी सरकारकडे वीज बिल भरण्यासाठी काही काळाचा अवधी देखील मागितला होता. मात्र, शेवटी वीज बिलाचा बोजा सहन न झाल्याने मुनेंद्र यांनी आत्महत्या केली. 

Related Stories

‘महापारेषण’च्या अध्यक्षांना ‘ग्रीनटेक’चा पुरस्कार

Amit Kulkarni

नव्या कोरोना स्ट्रेनमुळे शेअर बाजार गडगडला

Patil_p

तीन लोकसभा, 30 विधानसभा पोटनिवडणुकांची घोषणा

Patil_p

खात्मा केलेले दहशतवादी निघाले कोरोना पॉझिटिव्ह

Patil_p

राम मंदिराची उभारणी अनुभवता येणार

Patil_p

विनामूल्य लसीबाबत राज्यांनी निर्णय घ्यावा!

Patil_p
error: Content is protected !!