Tarun Bharat

मध्यरात्री मंदिरे उघडण्यास विरोध

वृत्तसंस्था/ कोईमतूर

नवीन वर्षाचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी मध्यरात्रीपर्यंत राज्यातील मंदिरे उघडी ठेवण्याच्या तामिळनाडू सरकारच्या निर्णयाला हिंदू मुन्नानी या संघटनेने विरोध केला आहे. मध्यरात्री मंदिरात जाणे ही हिंदूंची परंपरा नाही. मंदिरांमध्ये पहाटे किंवा दिवसाच्या काळात पूजा अर्चा आणि अभिषेक होतात. रात्री मंदिरे परंपरेनुसार बंद ठेवावी लागतात. तामिळनाडू सरकारने हजारो वर्षांपासून चालत आलेल्या या परंपरांचा भंग करू नये असे आवाहन हिंदू मुन्नानीचे प्रमुख नेते कादेश्वर सुब्रमनियन यांनी केले आहे. केवळ शिवरात्र आणि वैकुंठ एकादशी या दोनच प्रसंगी मध्यरात्रीपर्यंत मंदिरे उघडी असतात असे प्रतिपादन त्यांनी केले.

Related Stories

पाकच्या कुरापती सुरूच; पंजाबमध्ये ड्रोनमधून फेकली स्फोटकं

datta jadhav

लवकरच मिळणार आणखी पाच राफेल

Patil_p

केंद्राच्या दबावतंत्राविरोधात एकत्र लढुया!

Patil_p

कोरोना संकटात बिहारमध्ये रणधुमाळी

Patil_p

सरकारी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मोफत टॅब

Omkar B

तामिळनाडूचे कृषीमंत्री आर. दोराईकन्नू यांचे कोरोनाने निधन

datta jadhav