Tarun Bharat

मध्यवर्ती कुस्तीगीर संघटनेतर्फे 9 जानेवारीला भव्य कुस्ती मैदान

क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव

मध्यवर्ती कुस्तीगीर संघटना बेळगाव यांच्यातर्फे 9 जानेवारी रोजी भव्य कुस्ती जंगी मैदानाचे आयोजन आनंदवाडी कुस्ती आखाडय़ात करण्यात आले आहे.

सदर कुस्ती मैदानात प्रमुख कुस्ती कर्नाटक केसरी नागराज बस्सीडोनी भांदुरगल्ली व महाराष्ट्र चॅम्पियन पुण्याचा संतोष कडोलकर यांच्यात होणार आहे. दुसऱया क्रमांकाची कुस्ती आयईजी सेंटर बेंगळूरचा आकाश घाडी वि. आंतरराष्ट्रीय चॅम्पियन सौरभ पाटील राशिवडे, तिसऱया क्रमांकाची कुस्ती पवन चिकद्दीनकोप्प भांदुरगल्ली व किर्तीकुमार बेनके कंग्राळी, चौथ्या क्रमांकाची कुस्ती रोहित पाटील कंग्राळी व  सिद्धारूड धारवाड यांच्यात होईल.

याशिवाय, पाचव्या क्रमांकाची कुस्ती किरण अष्टगी कलखांब व संतोष गावडे पुणे, सहाव्या क्रमांकाची कुस्ती राजु गंदीगवाड भांदुरगल्ली, व विक्रम गावडे तुर्केवाडी, सातव्या क्रमांकाची कुस्ती हणमंत गंदीगवाड भांदुरगल्ली वि. वासू शिरतोडे राशिवडे, आठव्या क्रमांकाची कुस्ती गुरूलिंग मुधोळ एमईजी सेंटर बेंगळूर व दर्शन लहान कंग्राळी, नवव्या क्रमांकाची कुस्ती लक्ष्मण मुन्नोळी बेंगळूर व मंजू धारवाड भांदुर गल्ली, दहाव्या क्रमांकची कुस्ती श्रीघाडी वि कोईघोडे राशिवडे यांच्यात होणार आहे. त्याशिवाय 50 हून अधिक लहान मोठय़ा कुस्त्या होणार आहेत, असे संघटनेचे अध्यक्ष मारूती घाडी व सचिव वसंत सोनलकर यांनी कळविले आहे.

Related Stories

ऊस, अंबोती, झेंडू फुलांची विक्री

Amit Kulkarni

वाङ्मय चर्चा मंडळाची वार्षिक सभा उत्साहात

Omkar B

65 वर्षानंतरही सळसळता जोश!

Patil_p

देश महासत्ता बनण्यासाठी शिक्षण अत्यावश्यक

Patil_p

तालुक्याच्या पश्चिम भागाला पावसाने झोडपले

Omkar B

हिंडलगा कारागृहातील आणखी एका कैद्याचा मृत्यू

Amit Kulkarni