Tarun Bharat

मध्यवर्ती कुस्तीगीर संघटनेतर्फे 9 जानेवारी रोजी भव्य कुस्ती मैदान

क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव

येथील मध्यवर्ती कुस्तीगीर संघटना, बेळगाव आयोजित 9 जानेवारी रोजी आनंदवाडीच्या आखाडय़ात भव्य कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले आहे.

सदर कुस्ती मैदानात प्रमुख कुस्ती महाराष्ट्र चॅम्पियन पुण्याच्या संतोष कडोलकर व कर्नाटक केसरी नागराज बसीडोनी यांच्यात होणार आहे. दुसऱया क्रमांकाची कुस्ती आंतरराष्ट्रीय कुस्ती विजेता सौरभ पाटील राशीवडे वि. एमईजी सेंटर बेंगळूरचा आकाश घाडी यांच्यात, तिसऱया क्रमांकाची कुस्ती किर्तीकुमार बेनके कंग्राळी वि. पवन चिकदीनकोप्प यांच्यात, चौथ्या क्रमांकाची कुस्ती रोहित पाटील कंग्राळी वि. सिद्धारूढ धारवाड यांच्यात होईल. पाचवी कुस्ती किरण अष्टगी कलखांब वि. संतोष गावडे पुणे, सहावी कुस्ती राजु गंदीगवाड भांदुरगल्ली वि. विक्रम गावडे तुर्केवाडी, सातवी कुस्ती हणमंत गंदीगवाड भांदुरगल्ली वि. वासु शिरतोडे राशिवडे, आठवी कुस्ती गुरूलींग मुधोळ बेंगळूर वि. सुशांत कंग्राळी, नववी कुस्ती कमलेश राशिवडे वि. अजय हुबळी, दहाव्या क्रमांकाची कुस्ती लक्ष्मण मुन्नोळी वि. संजु धारवाड यांच्यात होणार आहे. याशिवाय लहान मोठय़ा 50 हून अधिक कुस्त्या होणार आहेत. आकर्षण कुस्त्यांमध्ये नंदेश इटगी वि. परशराम धारवाड, मेंढय़ाची कुस्ती श्री घाडी येळ्ळूर वि. ओम कोईघोडे रासोडे, ओम घाडी येळ्ळूर वि. राज लाबोरे लढतील.

Related Stories

वडगावमध्ये स्थापन होणार किडवाई कॅन्सर हॉस्पिटलचे केंद्र

Amit Kulkarni

पोस्ट ऑफीसतर्फे रेव्हेन्यू स्टॅम्पचे वितरण पुन्हा सुरू

Patil_p

गुन्हेगारी थोपविण्यासाठी पोलिसांना सहकार्याचे आवाहन

Amit Kulkarni

समर्थनगर येथे बसविला नवीन ट्रान्स्फॉर्मर

Amit Kulkarni

कृषी संजीवनीमार्फत थेट बांधावर मार्गदर्शन

Amit Kulkarni

पोदार स्कूलतर्फे सायक्लोथॉन उत्साहात

Amit Kulkarni