Tarun Bharat

मध्य प्रदेश : काँग्रेस नेता पी. सी. शर्मा यांना कोरोनाची बाधा

ऑनलाईन टीम / भोपाळ : 


मध्यप्रदेश मधील काँग्रेसचे नेते आणि आमदार पी. सी. शर्मा यांचे कोरोनाची लागण झाली आहे. स्वतः शर्मा यांनी शनिवारी ट्विट करत ही माहिती दिली. 


ते आपल्या ट्विट मध्ये म्हणाले की, माझे कोरोनाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. मी रुग्णालयात दाखल झालो आहे. कृपया माझ्या संपर्कात आलेल्या लोकांनी आपली चाचणी करुन घ्यावी, धन्यवाद. पुढे ते म्हणाले, सध्या माझी प्रकृती स्थिर आहे. माझ्यावर चिरायू रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 


दरम्यान, शर्मा हे मध्य प्रदेशातील भोपाळ दक्षिण पश्चिम विधानसभा क्षेत्रातील 14 व्या विधानसभेचे सदस्य आहेत. मुख्यमंत्री चौहान यांनी काँग्रेस नेते शर्मा यांना ट्विटरवरून लवकरात लवकर ठीक होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. 

Related Stories

चिदंबरम यांच्या पत्नीची मालमत्ता जप्त

Patil_p

चित्रपट निर्माते सावन कुमार यांचा अलविदा

Amit Kulkarni

उद्योगपती आनंद महिंद्रा आता ‘वैद्यकीय’ क्षेत्रात

Patil_p

आज पंतप्रधान मोदींची काही मुख्यमंत्र्यांशी चर्चा

Patil_p

जन्मठेप भोगत असलेल्या राम रहीमला ‘या’ कारणासाठी मिळाली पॅरोल

Archana Banage

उत्तरप्रदेशात 31,277 शिक्षकांना मिळणार नियुक्तीपत्र

datta jadhav