Tarun Bharat

मध्य प्रदेश : गेल्या चोवीस तासात 270 नवे कोरोना रुग्ण, एकूण संख्या 5735

Advertisements

ऑनलाईन टीम / भोपाळ

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. मध्य प्रदेशमध्ये देखील कोरोनाचा झपाट्याने फैलाव होत आहे. गेल्या चोवीस तासात 270 नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे मध्य प्रदेशमध्ये कोरोना रुग्णांची एकूण संख्या 5 हजार 735 वर जाऊन पोहचली आहे. तर आता पर्यंत 267 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

इंदोरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या सर्वात जास्त आहे.
मागील चोवीस तासात 78 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे इंदूरमधील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 2715 वर पोहचली आहे, तर कालच्या दिवसात दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती मुख्य चिकित्सा आणि स्वास्थ्य अधिकारी प्रवीण जडिया यांनी दिली.

दरम्यान, इंदोर मध्ये कोरोनाचा पाहिला रुग्ण 24 मार्च रोजी सापडला होता. त्यानंतर 25 मार्च पासून संपूर्ण जिल्ह्यात कर्फ्यू लावला असून जिल्ह्यातील अन्य क्षेत्रात देखील कडक लॉक डाऊन सुरू आहे.

Related Stories

अर्निया सेक्टरमध्ये दिसली ड्रोनसदृश्य वस्तू

datta jadhav

भाजपचे 12 निलंबित आमदार सर्वोच्च न्यायालयात

Amit Kulkarni

‘या’ बछड्याला आणखी बावरून टाकू नका…

Abhijeet Shinde

‘ही माझी अखेरची निवडणूक’

Patil_p

दिल्लीत टोळधाडीचा धोका; हाय अलर्ट जारी

datta jadhav

काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे शिंदे गटात जाणार?

Abhijeet Shinde
error: Content is protected !!