Tarun Bharat

मध्य प्रदेश : या जिल्ह्यातील नागरिकांनी लावला ‘सेल्फ लॉकडाऊन’

ऑनलाईन टीम / दमोह : 


देशात कोरोना विषाणूने अक्षरशः हाहाकार मजवला आहे. कोरोनाची दुसरी लाट झपाट्याने वाढत आहे. अनेक शहरात विकेंड लॉकडाऊन जारी करण्यात आले आहे. मध्य प्रदेशात देखील चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. दमोह जिल्ह्यात तर कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. असे असून देखील शिवराज सरकारने उपनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर केलेला नाही. त्यानंतर दमोह जिल्ह्यातील नागरिकांनी जगासमोर एक उदाहरण समोर ठेवले आहे. दमोह जिल्ह्यातील नागरिकांनी सरकारच्या आदेशाशिवाय दोन दिवसांचे लॉकडाऊन लावण्यााचा निर्णय घेतला.

  • सरकारने केले हात वर, नागरिकांनी सांभाळली जबाबदारी 


मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना विचारले की पूर्ण प्रदेशात विकेंड लॉकडाऊन केले आहे , मग केवळ दमोह जिल्ह्यात लॉकडाऊन का केले नाही? यावर उत्तर देताना शिवराज सिंह चौहान यांनी सांगितले की, दमोह त्यांच्या अधिकार क्षेत्रात नाही आहे. उपनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दमोह निर्वाचन आयोगाच्या अधिकार क्षेत्रात आहे. त्यामुळे सरकारने येथे लॉकडाऊन लावले नाही आहे. मात्र, दमोह जिल्ह्यात रुग्ण संख्या वेगाने वाढत आहे. परिस्थिती अधिक गंभीर होत आहे. त्यामुळे या जिल्ह्यातील नागरिकांनी  ‘सेल्फ लॉकडाऊन’ लावून घेत सर्व देशासमोर मिसाल ठेवली आहे. 

Related Stories

डीसीजीआयची बूस्टर डोससाठी CORBEVAX ला परवानगी

Archana Banage

बिहारमध्ये सत्तापालट, संजद-राजद एकत्र

Patil_p

पेन्शन सोडण्याची वरुण गांधींची तयारी

Patil_p

सेन्सेक्सची तिसऱया सत्रात मोठी पडझड

Patil_p

‘लावा-डेल’सह 14 कंपन्यांचे प्रस्ताव मंजूर

Patil_p

अयोध्येतील पुजा-यासह 16 पोलिसांना कोरोना

Patil_p