Tarun Bharat

मध्य प्रदेश : विवाह समारंभात पोहोचला कोरोनाबाधित व्यक्ती; 86 जणांना केले क्वारंटाइन

ऑनलाईन टीम / छतरपुर : 


मध्य प्रदेशातील छतरपुर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. छतरपुर जिल्ह्यातून 80 किलोमीटर दूर असणाऱ्या एका गावात सुरू असलेल्या विवाह समारंभात एक कोरोनाबाधित रुग्ण सहभागी झाला. त्यानंतर या विवाहात सामिल झालेल्या 86 जणांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. 


याबाबत अधिक माहिती देताना पंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी हिमांशू चंद्र यांनी सांगितले की, संबधित कोरोनाबाधित व्यक्तीने 14 जून रोजी या विवाह समारंभातील सहभागी झाला होता. 


पुढे ते म्हणाले, ही व्यक्ती तीन चार दिवसांपूर्वी हरियाणातील गुरग्राम मधून बडामलहरा तालुक्यातील मदनीबार या गावात आली होती. त्याच दिवशी त्याचे नमुने घेण्यात आले आणि त्याला होम क्वारंटाइन होण्यास सांगितले होते. 


पुढे ते म्हणाले 14 जून रोजी त्याचे रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर प्रशासनाची टीम गावात पोहोचली त्यावेळी तो घरात नव्हता. त्याचा शोध सुरू केल्यावर असे समजले की संबधित व्यक्ती जवळील गावामध्ये होणाऱ्या विवाह समारंभात गेला आहे. त्यानंतर प्रशासनाची टीम तात्काळ त्या विवाह समारंभात पोहचली व त्या व्यक्तीला त्याच दिवशी छतरपुर जिल्ह्यातील रुग्णालयात दाखल केले. आणि त्या विवाह समारंभात सहभागी झालेल्या 86 जणांना सुरक्षेच्या दृष्टीने क्वारंटाइन करण्यात आले आहे. 

Related Stories

पोलिसांनीच विकला जप्त केलेला 169 किलो गांजा

datta jadhav

झारखंडमध्ये राजकीय संकट कायम

Amit Kulkarni

‘बिग बॉस’चीही आर्थिक तंगी

Patil_p

16 जानेवारीपासून लसीकरण

Patil_p

संपूर्ण उसाचे गाळप झाल्याशिवाय जिल्ह्यातील कारखाने बंद करू नका ; स्वाभिमानीची मागणी

Archana Banage

भारतात 1.51 लाख कोरोनाबाधित, 4337 मृत्यू

datta jadhav