Tarun Bharat

मनपाच्या अटीमुळे लोकोत्सव आयोजकांपुढे पेचप्रसंग

प्रतिनिधी/ पणजी

कला व संस्कृती खात्यातर्फे वार्षिक आयोजित करण्यात यावयाच्या व दिवसेंदिवस लोकप्रिय ठरत असलेल्या लोकोत्सवासमोर नवा पेच प्रसंग निर्माण झाला आहे. क्षमतेपेक्षा जास्त दुकानांची आखणी आयोजकांनी केल्याने पणजीचे महापौर उदय मडकईकर यांनी अग्निशामक दल आणि वाहतूक पोलिसांकडून ना हरकत दाखला मिळवून नंतरच महापालिका या महोत्सवाच्या आयोजनास परवानगी देईल, अशी अट घातली आहे.

या महोत्सवाची लोकप्रियता सर्वदूर पसरल्याने हिच एक गंभीर समस्या कला व संस्कृती खात्यासमोर निर्माण झाली. लोकोत्सवात वाढत्या स्टॉल्सची मागणी लक्षात घेऊन यावर्षी कला आणि संस्कृती खात्याने 750 स्टॉल्स उभारण्याची तयारी ठेवली. गतवर्षी सुमारे 650 स्टॉल्स उभारले होते. यावर्षी प्रचंड मागणी वाढल्याने आणखी 100 स्टॉल्स वाढविले.

स्टॉल्स वाढविल्याने कला अकादमीच्या बाजूला असलेल्या दर्यासंगम शेजारील बांदोडकर मैदानाचा बरासचा भाग लोकोत्सवातील स्टॉल्समध्ये व्यापला गेला. दरवर्षी लोकोत्सवात येणारे व्यापारी असो वा कार्यक्रम पाहावयास येणाऱया प्रेक्षक वर्गांकडून वाट्टेल त्या ठिकाणी पार्किंग केले जाते. मोठय़ा प्रमाणात वाहतूक पोलीस त्या परिसरात तैनात करुन देखील पोलिसांचे नियंत्रण सुटते आणि गोंधळ होतो. यावर्षी सांतईनेज परिसरातील नागरिकांनी पार्किंग निश्चित करुनच लोकोत्सवाचे आयोजन करण्यात यावे, अशी गळ महापालिकेला घातली.

महापौर उदय मडकईकर यांनी सोमवारी कला व संस्कृती खात्याच्या अधिकाऱयांना बैठकीस बोलाविले त्यावेळी सांतईनेज परिसरातील नागरिक, वाहतूक पोलीस अधिकारी इत्यादी बैठकीस उपस्थित होते. मोठय़ा प्रमाणात स्टॉल्स वाढविल्यानंतर तेथील स्टॉल्स धारकांसाठी पार्किंगची व्यवस्था काय? तसेच आग लागली तर काय कराल? कोणत्या उपाय योजना आखलेल्या आहेत? असे सवाल करण्यात आले. 750 स्टॉल्स प्रत्येकी 1 वाहन धरले तरी एवढे वाहन कुठे पार्किंग करणार? जागा कुठे आहे? असे सवाल महापौरांनी केले. अगोदर वाहतूक पोलीस आणि अग्निशामक दलाकडून ना हरकत दाखले मिळवा, ते आणून द्या मगच महापालिका आयोजनासाठी रितसर परवानगी मिळवून देईल, अशी सूचना महापौरांनी केली. तसेच स्टॉल्सधारकांसाठी स्वच्छता गृहे लागतील ही व्यवस्था कुठे करणार? आणि किती स्वच्छतागृहे लागतील? असा सवालही करण्यात आला.

एकंदरित यामुळे आयोजकांसमोर पेचप्रसंग निर्माण झाला आहे. शुक्रवार दि. 10 जानेवारीपासून लोकोत्सवास प्रारंभ होणार आहे. त्याच्या पार्श्वभूमीवर आयोजकांसमोर पेचप्रसंग निर्माण झालेला आहे.

 

Related Stories

अधिवेशनात कोरोनावरच चर्चा व्हावी : दिगंबर कामत

Omkar B

मडगावातील दोन्ही बाजारपेठांची नगराध्यक्षांकडून पाहणी

Omkar B

कोपार्डे देवस्थानच्या न्हावणोत्सव मिरवणूक, दिंडी, पारंपरिक वादनाने ठरली आकर्षक

Amit Kulkarni

अग्निशामकच्या 15 जवानांचा गौरव

Patil_p

विजय – दिगंबरने पिंपळकटय़ावर केली प्रचाराची सांगता

Patil_p

सांतिनेज येथील थेगुर विहीरीच्या नुतनीकरणाला सुरुवात

Patil_p