मुंबई \ ऑनलाईन टीम
राज्यातील महाविकास आघाडी सरकार निवडणुका पुढे ढकलण्याचा प्रयत्न करत आहेत. शिवसेनेला पराभवाची भीती असल्यामुळे हा केविलवाणा प्रयत्न सुरु आहे. राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार घातला आहे. कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आली नाही आटोक्यात आली तरी ती संपली नाही आणि आता तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेवर उपाययोजना करायला लागणार आहेत. यावर भाजपचेही मत तेच आहे परंतु याचे कारण पुढे करुन जनगणना करता येणार नाही, निवडणूका घेता येणार नाही, नव्याने मतदार नोंदणीत अडथळे येतील यामुळे निवडणूका पुढे ढकलण्याचा डाव शिवसेनेचा आहे परंतु हा डाव भाजप हाणून पाडेल, असा घणाघात भाजप नेते आशिष शेलार यांनी केला आहे. आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेऊन मुंबई महापालिका निवडणुकीच्या मुद्दयावरून शिवसेनेला घेरले.
कोरोनाच्या महामारिचे कारण पुढे करुन शिवसेना आणि महाविकास आघाडीचा अजून २ वर्षे निवडणुका पुढे ढकलण्याचे कारस्थान सुरु आहे. हे कारस्थान जनतेसमोर आले आहे. असा कारस्थानचा प्रयत्न सत्ताधारी शिवसेनेनं केला तर तो बेकायदेशीर असेल आम्ही त्याला आव्हान देऊ आणि अशा प्रकारच्या प्रयत्नांना हाणून पाडल्याशिवाय भाजप राहणार नाही नसल्याचे आशिष शेलार यांनी म्हटले आहे.
मुंबईतील ३० वॉर्ड आहेत. ते शिवसेना आणि काँग्रेसला आजन्म जिंकता येणार नाहीत. त्यामुळे या वॉर्डांमध्ये फोडाफोडीचं राजकारण सुरू आहे, असं सांगतानाच ‘बंदूक भी तेरी, गोली भी तेरी, दिन-तारीख भी तेरी, दिन कहे दिन, शाम कहे शाम, शिवसेना को परास्त करने भाजप तयार है’, अशा शब्दात त्यांनी शिवसेनेवर निशाणा साधला.
शिवसेनेने मुंबईत नालेसफाईचा दावा केला आहे. पाच लाख मेट्रिक टन गाळ काढल्याचं सांगितलं आहे. त्याबद्दल पुरावे सादर करा. गाळ कुठे टाकला त्याचे फोटो जाहीर करा, वजन काट्याची पावती दाखवा. ही नालेसफाई संपूर्णपणे आभासी असल्याचे आशिष शेलार यांनी म्हटले आहे.


previous post