Tarun Bharat

मनपाने थकविले 86 कोटीचे वीजबिल

प्रतिनिधी / बेळगाव

घरगुती वीजबिल एक महिना थकले तर दुसऱया महिन्यात कर्मचारी ग्राहकांना न कळविता वीजपुरवठा बंद करतात. परंतु बेळगाव महानगरपालिकेने पथदीप व पाणी पुरवठय़ासाठी वापरलेल्या विजेचे 86 कोटीचे बिल थकविले आहे. तरीदेखील हेस्कॉम मनपाच्या विरोधात कोणतीही कारवाई करताना दिसत नाही. एकीकडे हेस्कॉमचे लाखो रुपयांचे नुकसान होत असताना अधिकारीवर्ग गप्प का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

शहरातील पथदीप व पाणीपुरवठा करण्यासाठी मनपा हेस्कॉमकडून वीज घेते. प्रत्येक महिन्याला आलेले वीजबिल हे मनपा अधिकाऱयांना पाठविले जाते. परंतु मागील काही महिन्यांपासून वेळच्या वेळी बिल भरले जात नसल्यामुळे थकबाकी वाढत चालली आहे. सध्या 83 कोटी रुपयांच्या वीजबिलाची थकबाकी मनपाकडे आहे. मनपाकडून कार्यालयांचे वीजबिल वेळच्या वेळी भरले जात असले तरी पाणीपुरवठा व पथदिपांचे बिल थकीत आहे.

कॅन्टोन्मेंटने थकविले 2.44 कोटी

मागील दोन वर्षांपासून कॅन्टोन्मेंटने विजेचे बिल थकविले आहे. त्यामुळे थकबाकीत वाढ होऊन सध्या दोन कोटी 44 लाख रुपयांचे बिल देणे आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डला अनेकवेळा नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. तरीदेखील बिल भरण्यात आलेले नाही. थकीत वीजबिलाची माहिती हेस्कॉमच्या कार्यकारी संचालकांच्या निदर्शनास आणून देण्यात आली आहे.

वेळच्यावेळी माहिती देऊनही दुर्लक्ष

एम. टी. अप्पण्णावर (शहर कार्यकारी अभियंते, हेस्कॉम)

मनपा तसेच कॅन्टोन्मेंट बोर्डला वेळच्यावेळी थकीत वीज बिलाविषयी माहिती देण्यात येते. सध्या मनपाचे 86 कोटी तर कॅन्टोन्मेंट बोर्डचे 2.44 कोटी रुपयांचे बिल थकीत असल्याचे त्यांनी सांगितले.

Related Stories

अपहरणप्रकरणी सात जणांना अटक

Amit Kulkarni

‘रेल टू एअर’ बसने सहाशे जणांचा प्रवास

Amit Kulkarni

‘एक जिल्हा, एक उत्पादन’ योजना दुर्लक्षित

Amit Kulkarni

शनिवार खूट चौकातील खड्डय़ात वृक्षारोपण

Amit Kulkarni

मतदान यंत्रे वितरित करण्याच्या ठिकाणी पावसामुळे चिखल

Omkar B

उमेदवारांची पारख करून मतदान करा

Patil_p