Tarun Bharat

मनपा अंतिम आरक्षण जाहीर झाल्याची शहरात चर्चा

बेळगाव / प्रतिनिधी

महापालिका वॉर्ड पुनर्रचना आणि आरक्षणाचा मुद्दा न्यायप्रवि÷ बनला आहे. याबाबत उच्च न्यायालयात म्हणणे मांडण्यासाठी नगरविकास खात्याने 2 आठवडय़ाचा अवधी घेतला आहे. मात्र महापालिका निवडणुकीसाठी वॉर्डनिहाय अंतिम आरक्षण जाहिर झाल्याची चर्चा शहरात जोरदार सुरू आहे. तसेच पोटनिवडणुकीपूर्वी महापालिका निवडणुका होणार याबाबतही चर्चेचा ऊत आला आहे.

महापालिका वॉर्ड पुनर्रचनेबाबत शहरवासीय नाराज असतानाच नगरविकास खात्याने वॉर्डनिहाय तात्कालिक आरक्षण जाहीर करून आक्षेप मागविले होते. वॉर्ड पुनर्रचना आणि आरक्षण नव्याने करण्याचे प्रतिज्ञापत्र न्यायालयात देऊन नगरविकास खात्याने केवळ आरक्षणाबाबत अधिसूचना जाहीर केली आहे. त्यामुळे नगरविकास खात्याच्या भुमिकेवर नाराजी व्यक्त करून माजी नगरसेवकांनी धारवाड उच्च न्यायालयात फेर विचाराची याचिका दाखल केली आहे. सदर याचिकेंतर्गत नगरविकास खात्याला न्यायालयाने नोटीस बजावली होती. त्यामुळे नगरविकास खात्याने आपले म्हणणे मांडण्यासाठी दोन आठवडय़ाचा अवधी घेतला आहे. या दरम्यान आपले म्हणणे मांडण्याबरोबरच अंतिम आरक्षणाची प्रत न्यायालयात सादर करण्यात येईल असे सांगण्यात आले होते. त्या दृष्टीने नगरविकास खात्याने हालचाली चालविल्या आहेत. अद्याप नगरविकास खात्याने महापालिका वॉर्डनिहाय अंतिम आरक्षण जाहीर केले नाही. मात्र नागरिकांनी नोंदविलेल्या आक्षेपाची नोंद घेऊन आवश्यक कारवाई केली आहे. पण याचदरम्यान अंतिम आरक्षण निश्चित झाले असल्याची चर्चा शहरात जोरदार सुरू आहे. महापालिकेच्या 58 पैकी 8 वॉर्डचे आरक्षण बदलण्यात आले असून, अंतिम आरक्षण निश्चित झाले आहे. तात्कालिक आरक्षणामधील केवळ 8 वॉर्डचे आरक्षण बदलून उर्वरित वॉर्डचे आरक्षण जैसेथे ठेवण्यात आले आहे. आरक्षण निश्चित करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी हिरवा कंदिल दर्शविला आहे. त्यामुळे महापालिका वॉर्डनिहाय अंतिम आरक्षण जाहीर झाले असल्याची चर्चा शुक्रवारी दिवसभर सुरू होती. तसेच लोकसभा पोटनिवडणुकीपूर्वी महापालिका निवडणुका होणार अशा चर्चेला ऊत आला आहे.  वॉर्डनिहाय अंतिम आरक्षणाची प्रत उपलब्ध आहे का? याची विचारणा महापालिका कार्यालयात करण्यात आली. तसेच अंतिम आरक्षणाची प्रत मिळविण्यासाठी काहींनी प्रयत्न चालविले होते. मात्र याबाबत महापालिकेच्या अधिकाऱयांकडे चौकशी केली असता अंतिम आरक्षणाबाबत नगरविकास खात्याकडून कोणताच अधिकृत आदेश आला नसल्याचे सांगण्यात आले. राज्य मुख्य निवडणूक अधिकाऱयांनी मतदार यादीबाबत आढावा घेऊन विविध सूचना केल्या होत्या. त्यामुळे लोकसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभुमिवर मतदार याद्या तयार करण्याचे काम सुरू आहे. अशी माहिती महापालिका अधिकाऱयांनी दिली. त्यामुळे अंतिम आरक्षणाची अधिसुचना  नगरविकास खात्याकडून जारी झाल्यानंतरच आरक्षणाबाबतचे चित्र स्पष्ट होणार आहे.

Related Stories

नागेश चौगुले यांचा सन्मान

Amit Kulkarni

एप्रिलपासून स्टार एअरची विमानसेवा विस्तारणार

Patil_p

लोकमान्य ‘उन्नती’ कार्यक्रमाचे आज उद्घाटन

Tousif Mujawar

हल्लेखोरांवर कठोर कारवाई करा

Patil_p

कारची दुचाकीला धडक; मामा-भाची ठार

Patil_p

श्री स्पोर्ट्स स्पर्धेसाठी पहिल्या 36 संघांना प्राधान्य

Amit Kulkarni