Tarun Bharat

मनपा कर्मचाऱयांना पोलिसांच्या लाठीचा प्रसाद

प्रतिनिधी/ बेळगाव

कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी काटेकोरपणे स्वच्छता मोहीम राबविण्याचा आदेश महापालिका आयुक्तांनी बजावला आहे. मात्र हे काम करणाऱया मनपा कामगारांना पोलीस प्रशासनाकडून लाठीचा प्रसाद मिळत आहे. त्यामुळे आम्ही कामावर कसे यायचे? असा प्रश्न मनपा आयुक्तांकडे उपस्थित केला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभुमिवर शहराची स्वच्छता नियमितपणे करा तसेच संपूर्ण शहर आणि उपनगरात सॅनिटायझरची फवारणी करण्याचा आदेश महापालिका आयुक्त जगदीश के. एच. यांनी बजावला आहे. शहरात बंदोबस्त वाढविण्यात आला असला तरी  सर्व अडथळे पार करून तुमची कामे करा अशी सूचना मनपा कर्मचाऱयांना केली आहे. त्यामुळे शहरासह उपनगर आणि ग्रामीण भागात राहणारे मनपाचे  अधिकारी व कर्मचारी कामावर येत आहेत. ग्रामीण भागात राहणाऱया स्वच्छता कर्मचारी पहाटे साडेपाच वाजताच येत आहेत. त्यानंतर आपली कामे आटोपून बारा वाजेपर्यंत घरी जात आहेत. तसेच मनपाच्या आरोग्य आणि महसूल विभागाच्या कर्मचाऱयांवर विविध जबाबदाऱया सोपविण्यात आल्या आहेत. मात्र याकरिता शहरात फिरावे लागत आहे. पण विणाकारण फिरत असल्याचा ठपका ठेवून पोलीसांकडून अडवणूक करण्यात येत आहे. तसेच काही कामगारांना लाठीचा प्रसाद देखील मिळाला असल्याची तक्रार होत आहे. त्यामुळे उपनगर आणि ग्रामीण भागात राहणाऱया कामगारांनी कामावर दांडी मारली आहे. आयुक्तांच्या सूचनेनुसार गळय़ात ओळखपत्र आणि मनपाने दिलेले जॅकेट अंगावर परिधान करून स्वच्छता कामे आणि पाणीपुरवठा करण्यासाठी येत आहे. पण विणाकारण कशाला फिरता असा आरोप करून पोलीस कर्मचारी लाठीने मारबडव करीत असल्याची तक्रार महापालिका आयुक्तांकडून करण्यात आली आहे.

काही युवक टाईमपास करण्यासाठी वाहने घेऊन शहरात फेरफटका मारत आहेत. त्यांची अडवणुक करून विचारणा होत आहे. तसेच काहींना लाठीचा प्रसाद देखील दिला जात आहे. पण या युवकांमुळे आपले काम करणाऱया महापालिकेच्या आणि पाणीपुरवठा करणाऱया कामगार देखील अडचणीत आले आहेत.

Related Stories

कॅन्टोन्मेंट पाणीटंचाईचा तिढा सुटणार कधी?

Amit Kulkarni

ज्योतिर्लिंग मंदिरात ज्योतिबाची विशेष पूजा

Amit Kulkarni

आजपासून एसएसएलसी परीक्षा

Amit Kulkarni

बिजगर्णी-होंनहट्टी येथे गवतगंजींना आग

Amit Kulkarni

गुरुवारीही पावसाने झोडपले

Omkar B

मराठा आरक्षणासाठी २० डिसेंबर रोजी सुवर्ण विधानसौधला घेराव

mithun mane