Tarun Bharat

मनपा कार्यालयात प्रवेशबंदीमुळे गर्दी वाढली

प्रतिनिधी/  बेळगाव

महापालिका मुख्य कार्यालय परिसरातील नगरमध्ये कोरोना विषाणूंची लागण झाल्याचे रुग्ण आढळल्याने परिसर कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे महापालिका कार्यालय चौदा दिवस नागरिकांसाठी बंद ठेवण्यात आले आहे. मात्र विविध कामांसाठी येणाऱया नागरिकांची गर्दी होत आहे. नागरिकांच्या सुविधेसाठी प्रवेशद्वारावर विशेष कक्ष उघडून अर्ज स्वीकारण्यात येत आहेत.

सुभाषनगर, पोलीस वसाहत, नेहरूनगर आणि वीरभद्रनगर अशा महानगरपालिका कार्यालयाभोवती असलेल्या परिसरात कोरोनाची लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे हा परिसर कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. खबरदारीची उपाययोजना म्हणून महापालिका कार्यालयात येणाऱया नागरिकांना बंदी घालण्यात आली आहे. कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरच नागरिकांना अडविण्यात येत आहे. पण जन्म-मृत्यू दाखला घेण्यासाठी येणाऱया नागरिकांना आता अडचणीत सापडले आहे. पण नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर जन्म-मृत्यू दाखल्यांकरिता अर्ज स्वीकारण्यात येत आहे. तसेच अर्जावर मोबाईल क्रमांक घेतला जात आहे.

अन्य कामाकरिता येणाऱया नागरिकांकडून अर्ज स्वीकारण्यासाठी विशेष कक्षाची उभारणी प्रवेशद्वारावर करण्यात आली आहे. त्या ठिकाणी अर्जांचा स्वीकार करून पुढील कारवाईसाठी संबंधित विभागाकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. पण अडीच महिन्यांच्या कालावधीनंतर महापालिकेचे कामकाज सुरू झाल्याने विविध कामासाठी नागरिकांची वर्दळ कार्यालय सुरू झाली होती. पण आता पुन्हा कार्यालय बंद झाल्याने नागरिकांना गैरसोयींचा सामना करावा लागणार आहे.

महापालिका कार्यालय नागरिकांसाठी किती दिवस बंद राहणार आहे, याची माहिती महापालिका आयुक्त जगदीश के. एच. यांना विचारली असता, नागरिकांना कार्यालयात येण्यास 14 दिवस बंदी घालण्यात आली आहे. विविध कामांसाठी नागरिक येत असल्याने गर्दी होते. या परिसरात कोरोनाची लागण झालेले रुग्ण आढळल्याने खबरदारी घेण्यात आली आहे. कार्यालय खुले राहिल्याने काही लोक कामानिमित्त कार्यालयात बसतात. कोणत्या नागरिकाला कोरोनाची लागण झाली आहे. याची माहिती मिळणे अशक्मय आहे. त्यामुळे कार्यालयात प्रवेश बंदी करण्यात आले आहे. मात्र नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी कार्यालय प्रवेशद्वारावर कक्ष उभारण्यात आले असून त्या ठिकाणी मोबाईल क्रमांक लिहून अर्ज देऊन नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका आयुक्त जगदीश के. एच. यांनी केले आहे. 

Related Stories

24 तास पाणी योजनेचा कॅन्टोन्मेंटला फायदा नाही!

Amit Kulkarni

आरपीडी-हिंदवाडी रस्त्यावर नो पार्किंग

Amit Kulkarni

तिवोली पुलाची समस्या मिटणार कधी?

Amit Kulkarni

‘मल्टिस्पेशालिटी’त जनावरांसाठी अत्याधुनिक सुविधा

Amit Kulkarni

गौंडवाड येथे पुन्हा दगडफेक

Amit Kulkarni

दुर्गानगर खानापूरमधील जळालेल्या ‘त्या’ महिलेचा मृत्यू

Patil_p