Tarun Bharat

मनपा कार्यालय आवारात अशोकस्तंभची उभारणी

प्रशासकीय इमारतीचे काम पूर्णत्वास : खुल्या जागेत कारंजासह इतर सजावट, महापालिकेच्या शोभेत पडली भर

प्रतिनिधी / बेळगाव

महापालिका मुख्य कार्यालय आवाराचा विकास करण्यात येत आहे. या ठिकाणी उभारण्यात आलेल्या प्रशासकीय इमारतीचे काम पूर्णत्वास आले आहे. तसेच कार्यालयासमोर असलेल्या खुल्या जागेत कारंजे व इतर सजावट करण्यात येत आहे. तसेच या ठिकाणी अशोकस्तंभ उभारण्यात आला आहे.

सरकारी व निमसरकारी कार्यालयात अशोकस्तंभाला खूपच महत्त्व आहे. विविध पुतळे उभारण्याऐवजी अशोकस्तंभ उभारण्यावर भर देण्यात येत असे. महापालिका कार्यालय आवारात अशोकस्तंभ उभारण्यात आला आहे. प्रशासकीय इमारतीच्या दर्शनी भागाला संसदीय इमारतीचे स्वरुप निर्माण झाले आहे. तसेच इमारतीच्या मागील बाजूस आणि मनपा कार्यालयाच्या प्रवेशद्वाराशेजारी खुल्या असलेल्या जागेत उद्यान निर्माण करण्यात येत आहे. याकरिता या ठिकाणी कारंजे बसविण्यात आले आहेत.

तसेच कारंजाच्या मध्यभागी अशोकस्तभ बसविण्यात आला आहे. किल्ला येथील अशोक चौकात याआधी स्तंभ उभारण्यात आला आहे. त्याचबरोबर आता महापालिका कार्यालय आवारात देखील शहरवासियांना अशोकस्तंभाचे दर्शन होणार आहे. कारंजाच्या मध्यभागी हा स्तंभ उभारण्यात आल्यामुळे महानगरपालिकेच्या शोभेत भर पडली आहे.

Related Stories

राज्यात तीन महिन्यांत 458 हुंडाबळीच्या तक्रारी

Amit Kulkarni

निपाणी तालुक्यात कोरोनाचा पहिला बळी

Patil_p

येळ्ळूर ग्रा. पं. वर म. ए. समितीचा झेंडा

Amit Kulkarni

महाद्वाररोड येथे जुगारी अड्डय़ावर धाड

Amit Kulkarni

खानापुरात 8 जि. पं.-27 ता. पं. निर्माण करा

Amit Kulkarni

कोरोनाबाबत नागरिकांनी जागरुक रहावे

Patil_p