Tarun Bharat

मनपा निवृत्त पेन्शनधारकांच्या पेन्शनला विलंब

प्रतिनिधी/ बेळगाव

महानगरपालिकेतील निवृत्त कर्मचाऱयांची पेन्शन वेळेत मिळत नसल्याने पेन्शनधारकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. दर महिन्याचे निवृत्ती वेतन विलंबाने होत असल्याने खर्चाचा ताळमेळ बसणे त्यांना अवघड जात आहे. त्यामुळे जिल्हा टेझरी कार्यालयाने मनपाच्या निवृत्त कर्मचाऱयांची पेन्शन वेळेत जमा करावी, अशी मागणी कर्मचाऱयांतून होत आहे.

सरकारी निवृत्त कर्मचाऱयांप्रमाणे मनपाच्या निवृत्त कर्मचाऱयांची पेन्शनदेखील वेळेत जमा करावी, अशी मागणी होत आहे. पेन्शन जमा करण्यास विलंब होत असल्याने वृद्धापकाळात आर्थिक कुचंबणा होत आहे. या कर्मचाऱयांमध्ये सफाई कर्मचाऱयांची संख्यादेखील अधिक आहे. दरम्यान सेवेत असताना व निवृत्त झाल्यानंतरदेखील वेळेत वेतन मिळत नसल्याने अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

Related Stories

आंदोलनकर्त्या शेतकऱयांचा आनंदोत्सव

Patil_p

खासदारांची ‘खाद्यचैन’ संपली

Patil_p

…अन् मोदींना आश्चर्याचा धक्काच बसला

datta jadhav

जम्मू काश्मीर : 581 नवे कोरोना रुग्ण; 6 मृत्यू

Tousif Mujawar

हेट स्पीचसंबंधी नाही स्पष्ट कायदा!

Patil_p

केरळमध्ये विझिंजम बंदर प्रकल्पाला विरोध

Patil_p