Tarun Bharat

मनपा महसूल उपायुक्तपदी प्रशांत हनगंडी रुजू

मनपा कर्मचाऱयांच्या तक्रारीची दखल : नागरिकांची अडलेली कामे मार्गी लावण्याची अपेक्षा

प्रतिनिधी /बेळगाव

महापालिकेचे महसूल उपायुक्त एस. बी. दोड्डगौडर यांची बदली अन्यत्र करून या पदावर यादगिरी जिल्हय़ातील प्रशांत हनगंडी यांची नियुक्ती करण्यात आली. याबाबतचा अधिकृत आदेश जारी झाल्यानंतर प्रशांत हनगंडी यांनी बुधवारी सकाळी महसूल उपायुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला. नागरिकांची अडलेली कामे महसूल उपायुक्तांनी मार्गी लावावीत, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत.

महसूल उपायुक्त एस. बी. दोड्डगौडर यांच्या विरोधात महापालिका कार्यालयातील कर्मचाऱयांनी जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांकडे तक्रार केली होती. नागरिकांची कामे करण्यास विलंब करीत असल्याचा आरोप करण्यात आला होता. तसेच अधिकाऱयांना विनाकारण मानसिक त्रास देण्याचे सत्र महसूल उपायुक्तांनी चालविले होते. त्यामुळे त्यांच्या मनमानी कारभाराबद्दल आक्षेप घेऊन त्यांना पदमुक्त करावे, अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱयांना देण्यात आले होते. पण या निवेदनाची दखल घेण्यात आली नाही. मात्र महापालिका आयुक्त रुदेश घाळी आणि अधीक्षक अभियंत्या लक्ष्मी निपाणीकर यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप महसूल उपायुक्तांनी केला होता. त्यामुळे महापालिका कार्यालयातील कर्मचारी आक्रमक झाले होते. कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून कामबंद करून आंदोलन छेडले होते. अखेर झालेल्या तक्रारीची दखल घेऊन एस. बी. दोड्डगौडर यांची अन्यत्र बदली करण्यात आली आहे.

महसूल उपायुक्तपदी यादगिरी जिल्हय़ातील उपविभाग अधिकारी प्रशांत हनगंडी यांची नियुक्ती केल्याचा आदेश नगरविकास खात्याने बजावला होता. याबाबत मंगळवारी सायंकाळी अधिकृत आदेश उपलब्ध झाला. त्यामुळे बुधवारी सकाळी महापालिकेत हजर होऊन प्रशांत हनगंडी यांनी महसूल उपायुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला आहे. महापालिकेत प्रथमच कार्यरत झाल्याने संपूर्ण कामकाजाची माहिती घेऊन महापालिकेच्या हिताच्यादृष्टीने कामकाज करू, असे ‘तरुण भारत’शी बोलताना प्रशांत हनगंडी यांनी सांगितले. प्रशांत हनगंडी यांनी यापूर्वी पोटनिवडणुकीवेळी महापालिकेत कामकाज केले होते. ते 2014 च्या बॅचचे केएएस श्रेणीतील अधिकारी असून, 2017 मध्ये रुजू झाले होते. विजापूर, यादगिरी अशा विविध ठिकाणी सेवा बजावल्यानंतर त्यांची बेळगाव पालिकेत नियुक्ती झाली आहे. बुधवारी कार्यभार स्वीकारून कामकाज सुरू केले आहे.

Related Stories

तालुका पातळीवरील ऍथलेटिक्स क्रीडा स्पर्धांना प्रारंभ

Amit Kulkarni

अटीतटीच्या लढतीत अरविंद पाटील विजयी

Patil_p

हलगा येथे गवतगंजीला शॉर्टसर्किटमुळे आग

Amit Kulkarni

वीरजवान मंजुनाथ गौडण्णवर अनंतात विलीन

Amit Kulkarni

जीएसटी करदात्यांसाठी सेवा केंद्राची सुविधा

Omkar B

शनिवारी 631 जण कोरोनामुक्त, 274 नवे रुग्ण चौघा जणांचा मृत्यू

Patil_p
error: Content is protected !!