Tarun Bharat

मनपा विभागिय कार्यालयात चलन देण्याची प्रक्रिया पुन्हा ठप्प

प्रतिनिधी/ बेळगाव

मालमत्ता कराचे चलन महापालिकेच्या महसूल निरीक्षकाकरवी देण्यात येत होते. मात्र महसुल निरीक्षकांचा लॉगईन आयडी पुन्हा बंद करण्यात आला असून, घरपट्टी चलन देण्याची प्रक्रिया पुन्हा ठप्प झाली आहे. त्यामुळे मालमत्ताधारकांची गैरसोय होत असल्याने चलन देण्यासाठी महसूल निरीक्षकांची लॉगीन आयडी सुरू ठेवण्याची मागणी होत आहेत.

महापालिकेच्या वतीने ऑनलाईन कर भरण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. तरी देखील काही नागरिक चलन घेण्यासाठी महापालिकेच्या विविध महसूल कार्यालयांमध्ये येत आहेत. पण सध्या केवळ सहाय्यक महसूल अधिकाऱयांना घरपट्टी चलन देण्याचे सर्वाधिकार देण्यात आले आहेत. महसूल निरीक्षकांच्या लॉगईन आयडीद्वारे घरपट्टी चलन देण्यात येत होते. मात्र सदर लॉगईन आयडी आता पुन्हा दुसऱयांदा बंद ठेवण्यात आले आहे. यापूर्वी ऑक्टोबर महिन्यात लॉगईन आयडी बंद करून केवळ सहाय्यक महसूल अधिकाऱयांना चलन देण्याची मुभा देण्यात आली होती. पण चलन घेण्यासाठी कार्यालयात येणाऱया नागरिकांची गैरसोय झाल्याने महसूल निरीक्षकांना चलन देण्याची मागणी करण्यात आली होती. चलन घेण्यासाठी कार्यालयात गेले असता सहाय्यक महसूल अधिकारी वेळेवर भेटत नव्हते. त्यामुळे नागरिकांना प्रतिक्षा करावी लागत होती. नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन चलन देण्यासाठी  महसूल निरीक्षकांना लॉगईन आयडी देण्यात आले होते. मात्र आता पुन्हा लॉगईन आयडी बंद ठेवण्यात आल्याने घरपट्टी चलन घेणाऱया नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे महसूल निरीक्षकांनी याबाबत महापालिका महसूल उपायुक्तांची भेट घेऊन चलन देण्यासाठी लॉगईन आयडी देण्यात यावा अशी विनंती केली होती. पण ई-आस्तीचे काम सुरू असल्याने लॉगईन आयडी बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे सहाय्यक महसूल अधिकाऱयांकडून चलन देण्यात यावे, असे महसूल उपायुक्तांनी सांगितले. त्यामुळे महसूल निरीक्षकांना रिकामी हाती परतावे लागले. मात्र यामुळे मालमत्ताधारकांची पुन्हा धावपळ वाढणार आहे. त्यामुळे महापालिका आयुक्तांनी याची दखल घेऊन महसूल निरीक्षकांना देखील घरपट्टी चलन देण्यासाठी लॉगईन आयडी द्यावा अशी मागणी होत आहे.

Related Stories

मराठीचे अस्तित्व नष्ट करण्याचा शासनाचा प्रयत्न

Amit Kulkarni

केआर शेट्टी, बेळगाव ग्लॅडिएटर्स संघ विजयी

Amit Kulkarni

शहापूर मंगाई देवीची यात्रा साध्या पद्धतीने

Patil_p

दर्शन रावळ, सीयाना कॅथरीन यांची उद्या लाईव्ह कॉन्सर्ट

Amit Kulkarni

समाज कल्याण कार्यालयाचे 22 रोजी उद्घाटन

Amit Kulkarni

संत साहित्यामुळे मराठी भाषा समृद्ध

Amit Kulkarni
error: Content is protected !!