Tarun Bharat

मनपा व्याप्तित 406 नागरीक होम क्वारंटाईन

प्रतिनिधी/ बेळगाव

जिल्हय़ात आतापर्यंत 74 नागरीकांना कोरोना विषाणुची लागन झाली असून, त्यापैकी अनेक रूग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. मात्र या रूग्णांच्या संपर्कात आलेल्या 406 जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. तसेच परराज्यातून आलेल्या नागरिकांना होम क्वारंटाईन करून  दिलेल्या कालावधीमध्ये घराबाहेर पडण्यास बंदी आहे.

शहर आणि जिल्हय़ात कोरोनाच्या रूग्णाची संख्या वाढत चालली आहे. कोरोना झालेल्या रूग्णांना रूग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या नागरीकांचा शोध घेऊन त्यांची तपासणी करण्यात येत आहे. तसेच प्राथमिक व दुय्यम संपर्कात असलेल्या नागरिकांना होम क्वारंटाईन करण्यात येत आहे. प्राथमिक संपर्कात असलेल्या रूग्णाच्या नातेवाईकांसह कुटुंबातील सदस्यांना हॉटेल किंवा सभागृहात क्वारंटाईन करण्यात येत आहे. दुय्यम संपर्कात आलेल्या 269नागरीकांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. बेळगाव शहरात प्रथम संपर्कात आलेल्या 137 नागरीकांचा क्वारंटाईनचा कालावधी पूर्ण झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तसेच क्वारंटाईन करण्यात आलेल्या सर्व नागरिकांचा स्वॅब तपासणी करण्यात आला होता. त्यावेळी त्यांचा अहवाल निगेटीव्ह आला आहे.  पण त्यांना 14 दिवस होम क्वारंटाईन राहण्याची राहण्याची सूचना करण्यात आली आहे. तसेच कोरोनामुक्त झालेल्या रूग्णांना देखील होम क्वारंटाईन  ठेवण्यात आले आहे. त्यामुळे बेळगाव शहरात कोरोनाग्रस्थांच्या प्रथम व दुय्यम संपर्कात  आलेले 406 इतके नागरीक सध्या होम क्वारंटाईन आहेत.

परराज्यातून आणि परदेशातून आलेल्या नागरीकांना देखील होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. सध्या पुणे, मुंबई, बेंगळूर अशा विविध शहरातून आलेल्या नागरीकांची आरोग्य तपासणी करून त्यांना 14 दिवस तसेच 28 दिवस होम क्वारंटाईन राहण्याची सूचना करण्यात आली आहे. होम क्वारंटाईन केल्यानंतर नागरीकांच्या हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का मारला जातो. तसेच महापालिकेच्या कर्मचाऱयांकरवी घरावर स्टिकर चिकटविण्यात येते. तसेच होम क्वारंटाइन केलेल्या नागरिकांना बाहेर फिरण्यास बंदी आहे.

Related Stories

अनगोळ मारूती मंदिराच्या रथाचे 8 रोजी होणार आगमन

Amit Kulkarni

बंद सिग्नलमुळे वाहनधारकांची तारांबळ

Amit Kulkarni

पॉझिटिव्ह रुग्णसंख्या आता 4 टक्क्यांवर

Amit Kulkarni

झेब्रा क्रॉसिंग पट्टय़ांच्या आरेखनाकडे दुर्लक्ष

Amit Kulkarni

रणजित चौगुले यांचा रोटरीकडून सन्मान

Patil_p

कपिलेश्वर तलावात सांडपाणी

Amit Kulkarni