Tarun Bharat

“मनसुख हिरेनच्या हत्येमागे सचिन वाझेचाच हात”

Advertisements

एनआयएच्या आरोपपत्रात अनेक खुलासे

मुंबई/प्रतिनिधी

मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकं सापडल्याच्या प्रकरणामुळे चर्चेत आलेल्या सहाय्यक पोलीस निरिक्षक सचिन वाझे त्यांना पोलीस दलातून बडतर्फ करून या प्रकऱणात त्यांना अटक करण्यात आली होती. दरम्यान, बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेने उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी का ठेवली, याचं उत्तर अखेर मिळालं आहे. सचिन वाझेला आपली जुनी ओळख परत मिळवायची होती म्हणून त्याने हा सर्व केल्याचं NIA च्या तपासात उघडकीस आलं आहे. दरम्यान, आता मनसुख हिरेन यांच्या हत्येचा खुलासाही NIA ने आपल्या आरोपपत्रात केला आहे.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी ठेवल्याप्रकरणी मुख्य सूत्रधार आणि बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे याने उद्योगपतीकडून पैसे उकळण्यासाठी हा कट रचला होता, अशी माहिती राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) सादर केलेल्या आरोपपत्रात देण्यात आली आहे. याचसोबत, वाहनाचे मूळ मालक मनसुख हिरेन यांच्या हत्येचा देखील कट वाझेनेच रचला होता असं या आरोपपत्रात नमूद करण्यात आलं आहे. इतकंच नव्हे तर वाझेने ओबेरॉय या पंचतारांकित हॉटेलातील एक खोली वेगळ्या नावाने तब्बल १०० दिवस आरक्षित केली होती, अशी देखील माहिती एनआयएने आपल्या आरोपपत्रात दिली आहे.

शिवदीप लांडे यांची फेसबुक पोस्ट
राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणाऱ्या मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा अखेर उलगडा झाला आहे. तशी माहिती खुद्द एटीएसचे DIG शिवदीप लांडे यांनी दिली आहे. लांडे यांनी फेसबुकवर एक पोस्ट केलीय. त्या पोस्टमध्ये त्यांनी सॅल्यूट ठोकणारा एक फोटो टाकला आहे. तर अती संवेदनशील मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा उलगडा झाल्याचं त्यांनी म्हटलंय.

Related Stories

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी यंत्रणांमध्ये समन्वय महत्वाचा : दतात्रय भरणे

Tousif Mujawar

Patrachal Land Scam: संजय राऊतांना जामीन की पुन्हा कोठडी?

Abhijeet Khandekar

कोरोना विरोधातील योद्धय़ांसाठी विमा कवच

Archana Banage

शौचालयाची टाकी साफ करताना चार तरुण टाकीत पडले, तिघांचा मृत्यू

datta jadhav

हरिद्वार धर्म संसदेत प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी यति नरसिंहानंद अटकेत

Archana Banage

महाबळेश्वर शहर झाले कोरोना मुक्त

Patil_p
error: Content is protected !!