Tarun Bharat

मनसुख हिरेन यांच्या मृत्यूवर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया

Advertisements

माहिती असेल तर तपास व्हायला हवा
मुंबई/प्रतिनिधी

उद्योपगती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांचा साठा असलेलं वाहन सापडल्याप्रकरणी तपास सुरु असतानाच वाहनाचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा खाडीजवळ आढळून आल्याने गूढ वाढलं आहे. याआधी मनसुख हिरेन यांनी मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि पोलीस आयुक्तांना पत्र लिहून काही चूक केलेली नसताना पोलिसांकडून आरोपी असल्यासारखी वागणूक दिली जात असल्याची खंत पत्राद्वारे व्यक्त केली होती. दरम्यान स्फोटकांचा साठा असलेलं वाहन सापडल्यानंतर काही दिवसात हिरेन यांचा मृतदेह सापडला आहे. दरम्यान पोलिसांनी हिरेन यांनी आत्महत्या केल्याचं सांगत असताना दुसरीकडे कुटुंबीय मात्र हा दावा फेटाळत आहेत. यादरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.

संजय राऊत यांनी जर उपस्थित केलेले प्रश्न योग्य, मुद्देसूल असतील आणि त्यांच्याकडे काही माहिती असेल तर नक्कीच तपास व्हायला हवा. ज्या व्यक्तीचा मृत्यू झाला ती घटना धक्कादायक आणि दुर्दैवी आहे. ती आत्महत्या की हत्या याबाबतही लोकांच्या मनात शंका आहे. ती शंका लवकरात लवकर दूर होणं गरजेचं आहे. हिरेन यांच्या मृत्यूचं भांडवल करु नये. कारण ती निरपराध व्यक्त्ती आहे. त्याचा बळी कोणत्या कारणामुळे गेला आहे? त्याला कोण जबाबदार आहे? या सगळ्या गोष्टींबाबतचं सत्य जितक्या लवकर गृहखातं समोर आणेल तितकं हे या सरकारच्या प्रतिष्ठेसाठी आणि प्रतिमेसाठी योग्य ठरेल,” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

Related Stories

केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंग शेखावत आज यादगीरमध्ये

Amit Kulkarni

केंद्राने राज्यांना मोफत कोविड लस द्यावी : सिद्धरामय्या

Abhijeet Shinde

एसएसएलसी परीक्षेपूर्वी शिक्षकांना दिली जाणार लस

Abhijeet Shinde

कर्नाटकात सोमवारी पॉझिटिव्ह रुग्ण संख्येत घट

Abhijeet Shinde

हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबरपासून

Omkar B

लसीविषयीचा गोंधळ शक्य तितक्या लवकर दूर करा

Amit Kulkarni
error: Content is protected !!