Tarun Bharat

मनसेचे वसंत मोरे यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून ऑफर !

ऑनलाईन टीम/तरुण भारत

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी लाऊडस्पीकर न काढल्यास मशिदींसमोर हनुमान चालीसा वाजवण्याच्या वक्तव्य केलं होत. यांनतर पक्षातील अंतर्गत संघर्ष पुढे आला. नगरसेवक वसंत (Vasant More) मोरे यांनी यासंदर्भात आपली भूमिका मंडली होती. याभूमिकेवर राज ठाकरे नाराज होते. यांनतर गुरुवारी राज ठाकरे यांनी पुण्यातील पदाधिकाऱ्यांना मुंबईला बोलवलं होत. परंतु वसंत मोरे यांना बोलावलं नाही. उलट त्यांच्याकडे असणारे मनसे शहराध्यक्ष पद काढून घेऊन त्यांच्या जागी नगरसेवक साईनाथ बाबर (sainath babar) यांची पक्षाच्या पुणे शहर अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे वसंत मोरे नाराज असल्याचं बोललं जात असताना त्यांना शिवसेनेने ऑफर दिली असल्याचं समजत आहे. तर स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना ऑफर दिल्याचे वृत्त आहे.

दरम्यान, पुणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष पदावरून (MNS) नाराज वसंत मोरे (Vasant More) यांची हकालपट्टी केल्यांनतर शिवसेनेने (Shiv Sena) ऑफर दिली आहे. वसंत मोरे यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुणे शहर प्रमुख पदावरुन दूर केले होते. त्यानंतर वसंत मोरे यांनी आपण कायमच मनसेसोबत राहणार असल्याचे कालच म्हटले होते. मात्र, आता युवा शिवसेना नेते वरुन देसाई (Varun Desai) यांनी त्यांच्याशी थेट संपर्क साधत शिवसेनेत येण्याची ऑफर दिला आहे. शिवसेना प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांच्याकडून त्यांना विचारणा करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.

दरम्यान, नाराज वसंत मोरे हे राष्ट्रवादीत जाण्याची शक्यता असल्याची चर्चा होती. मात्र, कालच त्यांनी स्पष्टीकरण देत आपण राज ठाकरे यांच्यासोबत सुरुवातीपासून होतो आणि यापुढेही राहू, असे स्पष्ट केले होते. मात्र, आता त्यांना सेनेकडून विचारणा झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून ही विचारणा झाली आहे. वसंत मोरे सेनेच्या वाटेवर, असल्याची चर्चा आहे. काँग्रेस नेत्यांनीही त्यांच्याशी समपर्क साधला आहे. मात्र, वसंत मोरे यांच्याकडून कोणाला अजून काही ऊत्तर आलेले नाही. मोरे काय भूमिका घेतात त्याकडे लक्ष लागले आहे.

Related Stories

जिल्हा पोलीस दलात 95 टक्के लसीकरण पूर्ण

Patil_p

सातारा शहर अंधारात

Patil_p

मालकापुरात पाच दिवस जनता कर्फ्यू

Archana Banage

कोल्हापूर : ‘झेडपी’तील कामकाज उद्यापासून पूर्ववत

Archana Banage

पुणे विभागातील 6 लाख 60 हजार 776 रुग्ण कोरोनामुक्त!

Tousif Mujawar

राज्यपालांचे धोतर फेडणाऱ्यास 1 लाखाचे रोख बक्षीस

datta jadhav