Tarun Bharat

मनाविरुध्द बदली झाल्याने पोलिसाचा आत्महत्येचा प्रयत्न

Advertisements

प्रतिनिधी/ सातारा

नको असलेल्या ठिकाणी बदली झाल्याने आत्महत्येचा इशारा देणारे पोलीस कर्मचारी विजय माळी हे मंगळवारी दुपारी यवतेश्वर येथे बेशुद्धावस्थेत सापडले आहेत. त्यामुळे माळी यांना जिल्हा शासकीय रूग्णालयात उपाचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. या घटनेमुळे पोलीस दलात चांगली खळबळ उडाली आहे.

    वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी विजय माळी यांनी मंगळवारी सकाळी व्हिडिओ बनवला. या व्हिडिओच्या माध्यमातून ते म्हणाले, त्यांची बदली म्हसवड पोस्ट येथे झालेली आहे. परंतु ते समक्ष मुलाखतीला गेलो असता त्यांना शाहूपुरी किंवा डॉग स्कॉड या ठिकाणी बदली देण्यात आली. परंतु सोमवारी गॅजेस्ट बाहेर पडले तेव्हा त्यांच्या नावापुढे म्हसवड पोलीस ठाणे दाखवण्यात आले आहे. यामुळे त्यांनी पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांची समक्ष भेट घेतली. यावेळी पोलीस अधीक्षकांना भेटून म्हसवड येथे दोन ड्रायव्हर आहेत. तसेच माझी प्रकृती चांगली नसून मणका दुखी, बीपी, शुगरचा त्रास आहे. साताऱयात त्यांचा उपचार सुरू असल्याचे सांगितले. परंतु पोलीस अधीक्षकांनी त्यांची विनंती अमान्य केली.

 कुणाची तरी मर्जी राखण्यासाठी त्यांची बदली म्हसवड येथे केल्याची चर्चा सुरु आहेत. त्यांचे आई-वडील वयोवृद्ध असून मोठा भाऊ व्यसनाधीन आहे. लहान भावाला एक वर्ष झाले पगार नाही. सर्व कुटुंब त्यांच्यावर चालत आहे. म्हसवड येथे बदली करूनही त्यांच्यावर अन्याय झाल्याचे व्हीडिओच्या माध्यमातून सांगत आत्महतेचा इशारा दिला. हा व्हिडिओ सोशल मिडियावर प्रसारित होताच पोलीस दलात खळबळ उडाली. मंगळवारी दुपारी पोलीस कर्मचारी माळी हे यवतेश्वर येथे बेशुद्ध अवस्थेत सापडले. त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल केले आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे.

Related Stories

रिक्षा व्यवसायिकांना एक वर्षांची फिटनेस मुदत द्या

Abhijeet Shinde

माजी मंत्री माणिकराव गावित यांचं निधन

datta jadhav

पोलिसाला धमकी प्रकरणी आरोपीला 1 वर्ष कारावास

Patil_p

पदवीधर आणि शिक्षक मतदार निवडणुकीमुळे मतदारांची होणार दिवाळी

Patil_p

लग्नाचे अमिष दाखवणाऱया सातारच्या बंटी-बबली इस्लापूर पोलीसांकडून अटक

Patil_p

गणपती विसर्जन मिरवणूक याचिका हायकोर्टाने फेटाळली

datta jadhav
error: Content is protected !!