Tarun Bharat

मनिका बात्राला कांस्यपदक

Advertisements

वृत्त संस्था/ लेस्को (स्लोव्हेनिया )

येथे सुरू असलेल्या विश्व टेबल टेनिस स्पर्धेत महिलांच्या विभागात भारताच्या मनिका बात्राने कांस्यपदक पटकाविले. शनिवारी महिला एकेरीच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात चीनच्या वेंग इडीने बात्राचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला.

शनिवारच्या सामन्यात चीनच्या वेंग इडीने मनिका बात्राचा 11-7, 7-11, 13-11, 10-12, 11-7, 11-5 असा पराभव केला. मात्र, या स्पर्धेत महिला दुहेरीत भारताच्या मनिका बात्रा आणि अर्चना कामत यांनी अंतिम फेरीत प्रवेश मिळविताना चीनच्या वेंग इडी आणि विसेन यांचा 11-6, 8-11, 11-6, 5-11, 11-8 असा पराभव केला.

Related Stories

3 सुवर्ण जिंकले, तरी ड्रेसेलची ‘ती’ महत्त्वाकांक्षा अधुरीच!

Patil_p

अझारेन्का, पिरोन्कोव्हा, सेरेना उपांत्यपूर्व फेरीत

Patil_p

पराभवाची मालिका खंडित करण्याचे दिल्ली-बेंगळूरचे ध्येय

Patil_p

भारतीय महिला हॉकी संघाचा पहिला विजय

Patil_p

भारताला हरवून दक्षिण कोरिया अंतिम फेरीत

Amit Kulkarni

पॅरालिम्पिकमध्ये दोन पदकं जिंकून अवनीने रचला इतिहास

datta jadhav
error: Content is protected !!